जालना जिल्ह्यातील मंठा तालुका सध्या राजकीयदृष्ट्या चांगलाच गजबजला आहे. युवा आणि लोकाभिमुख उद्योजक संजय शंकरराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारांचा प्रभाव असलेले चव्हाण हे समाजकार्यातून लोकांशी घट्ट नातं निर्माण केलेले नाव आहे.
सामाजिक कार्यातून राजकारणात झेप
गेल्या दोन दशकांपासून संजय चव्हाण हे हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सर्व समाजघटकांमधून मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले असून, गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत त्यांनी प्रभावी उपस्थिती दाखवली आहे.
तरुणांमध्ये संजय चव्हाणांविषयी उत्साह
२०१९ च्या परतूर-मंठा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली होती. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बंजारा, दलित, ओबीसी आणि मराठा समाजात त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, या निवडणुकीत ते नवा राजकीय समीकरण निर्माण करू शकतात, अशी चर्चा स्थानिक पातळीवर आहे.
“सामाजिक कार्यातून राजकारणात परिवर्तन घडवणारा चेहरा” अशी ओळख असलेले संजय शंकरराव चव्हाण हे आता जिल्हा परिषद निवडणुकीत उतरल्याने तरुणांमध्ये नवी प्रेरणा आणि आशा निर्माण झाली आहे. जनतेत त्यांच्या उमेदवारीबद्दल प्रचंड उत्सुकता असून, संजय चव्हाण यांचं मैदानातलं पाऊल या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
















