हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भोकरदन बसस्थानक परिसरात पोलीस चौकी स्थापन करा – अनिताताई जाधव यांची मागणी; टवाळखोरांवर दामिनी पथकाचा कठोर इशारा

On: January 28, 2026 7:14 AM
Follow Us:
भोकरदनमध्ये दामिनी पथकाकडून शालेय विद्यार्थिनींचे समुपदेशन

भोकरदन |२७ जानेवारी २०२६

भोकरदन शहरात शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात दामिनी पथक तात्काळ दाखल झाले आहे. बसस्थानक परिसरात पोलीस चौकी स्थापन करण्याची ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या अनिताताई जाधव यांनी केली आहे.

या घटनेबाबत कट्टा न्यूज मराठी सह विविध वर्तमानपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक नोपाणी यांनी तात्काळ दखल घेत दामिनी पथक भोकरदन शहरात पाठवले.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुरुवारी (दि.२२) जालना येथील दामिनी पथक भोकरदनमध्ये दाखल झाले. पथकाने तक्रारदार सौ. अनिताताई जाधव यांच्यासह न्यू हायस्कूल भोकरदन येथे भेट देत विद्यार्थिनींची बैठक घेऊन समुपदेशन केले. टवाळखोर मुलांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी दामिनी पथकातील सौ. शेंदूरकर मॅडम, ज्योती राठोड, शारदा गायकवाड यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. नन्नावरे, शिक्षकवृंद उपस्थित होते.

दरम्यान, अनिताताई जाधव यांनी भोकरदन पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भेट घेऊन ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. बसस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवावी व कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शाळा व महाविद्यालय सुरू होण्याच्या व सुट्टीच्या वेळी विद्यार्थिनींचा पाठलाग करून छेडछाड करण्याच्या घटना वाढत असल्याने अनेक मुली मानसिक तणावात असून काहींनी शिक्षण सोडण्याचा विचार केल्याचेही शिक्षकांनी नमूद केले.


🔹 चौकट : मुख्याध्यापकांनी मानले आभार

मुख्याध्यापक श्री. नन्नावरे यांनी सांगितले की, अनिताताई जाधव यांनी आवाज उठवल्यामुळे दामिनी पथक शाळेत आले व विद्यार्थिनींना मोठा आधार मिळाला. याबद्दल त्यांनी दामिनी पथक व अनिताताई जाधव यांचे मनापासून आभार मानले.


📌 संबंधित बातम्या

👉 अशीच विश्वासार्ह, जलद आणि प्रभावी बातमी वाचण्यासाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

संजीव पाटील

संजीव पाटील हे २० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले पत्रकार असून महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व सार्वजनिक घडामोडींचे राज्यभरातून वार्तांकन करतात. नागरिकांचे प्रश्न आणि प्रशासनाशी संबंधित घडामोडी तथ्याधारित व विश्वासार्ह पद्धतीने मांडणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

Leave a Comment