हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदाराविरोधात संताप; गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

On: June 27, 2026 11:19 AM
Follow Us:
पत्रकारांना धमकी प्रकरणी खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चिखली तालुका पत्रकार संघाचे निवेदन

चिखली प्रतिनिधी |विशाल गवई 

पत्रकारांना कथितरित्या शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याच्या आरोपावरून ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाने केली आहे. यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

शुक्रवारी (दि. 26 जून) देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांनी एका वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण विचारले असता खासदारांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि “पुन्हा विचारायला आलात तर मारून पाठवीन” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. पत्रकार संघाने या प्रकाराला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला गंभीर आघात असल्याचे म्हटले आहे.

पत्रकार संघाच्या म्हणण्यानुसार, पत्रकारांना निर्भयपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय आपले कर्तव्य बजावता यावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण गावंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी जेष्ठ पत्रकार संतोष लोखंडे, कैलास गाडेकर, रमाकांत कपूर, रविंद्र फोलाने, इफ्तेखार खान, महेश गोंधणे, छोटू कांबळे, भरत जोगदंडे, रमिझ राजा, कमलाकर खेडेकर, योगेश शर्मा, सय्यद साहिल, राजेश बिडवे, किरण शेजोळ, ऋषी भोपळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

नितीन फुलझाडे म्हणाले : “पत्रकारांना धमकावणे किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. संबंधित खासदाराविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील.”

पत्रकार संघाने शासनाने या प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


📢 वाचकांसाठी महत्त्वाचे

तुमच्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.


Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

महाराष्ट्रात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री फडणवीस

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

विदर्भातील शेतकरी-शेतमजुरांसाठी राहुल गांधींना सुबोध सावजींचे आमंत्रण

विदर्भातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी यावे; सुबोध सावजींची ‘किसान एवं खेत मजदूरों की आवाज’ कार्यक्रमाची मागणी

केंद्रीय मंत्र्यांच्या गावाला जाणारी मोडकळीस एसटी बस, तारांनी बांधलेला पत्रा

केंद्रीय मंत्र्यांच्या मूळ गावाला जाणारी एसटीच मोडकळीस; तारांनी बांधलेली, पत्र्याच्या ठिगळाची बस… म्हणावी की धोक्याची सफर ?

Leave a comment