दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शुभमुहूर्तावर संस्थान कार्यालयात लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, धर्माधिकारी श्री. टाकळकर आणि व्यवस्थापक श्री. बिडकर यांच्या हस्ते श्री बालाजी महाराजांच्या ऐतिहासिक दागिन्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली.
तर दि. १० नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी १० वाजता संस्थान कार्यालयात सरस्वती पूजनाचा कार्यक्रम पार पडला. वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, श्री. टाकळकर आणि व्यवस्थापक श्री. बिडकर यांच्या हस्ते संस्थानच्या खातेबुकाचे आणि पंचांगाचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ब्रह्मवृंदांनी पारंपरिक पद्धतीने पंचांग वाचन केले.
लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्याच्या निमित्ताने श्री बालाजी मंदिरासह संस्थान कार्यालयाची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे दीपावलीचा उत्साह अधिकच वाढला.
या दोन्ही धार्मिक कार्यक्रमांना सर्व क्षेत्रोपाध्ये, देवोपाध्ये, त्रैशाखीय ब्राह्मणवृंद तसेच संस्थानचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपावली पाडव्याच्या पारंपरिक प्रथेनुसार माळी समाजाच्या वतीने मंडपोत्सवातील लाकडी लाटा वर्षभरासाठी संस्थानच्या बळदात भक्तिभावाने ठेवण्यात आल्या. यावेळी संस्थानच्या वतीने माळी समाजाच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच पुजाऱ्यांमार्फत त्यांना खोबऱ्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाविक आणि व्यापारी वर्गाला कानगी देण्यासाठी संस्थानच्या वतीने चार स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पारंपरिक धार्मिक प्रथा आणि संस्थानची परंपरा यांचे दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडले.
श्री बालाजी संस्थानमधील लक्ष्मीपूजन, सरस्वती पूजन आणि दीपावली पाडव्याचे पारंपरिक विधी भक्तिभावाने पार पडल्याने देऊळगाव राजा परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
📰 देऊळगाव राजा आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews.in ला भेट देत राहा.
📲 KattaNews.in WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा – ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवा!
संबंधित बातम्या
- वनरक्षक होण्याचे स्वप्न अधुरेच! देऊळगाव राजात मोकाट गायीच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
- पाणी मिळाले, पण राजकीय पोळी भाजली कुणाची?पेनटाकळीच्या संघर्षाचा राजकीय पंचनामा!
- बुलढाण्यात रात्री २ वाजता चड्डी गँगचा धुमाकूळ! भिंतीला छिद्र पाडून घरात शिरण्याचा प्रयत्न; लक्ष्मीपूजनाच्या रात्री दोन घरांना टार्गेट, चौघे CCTV मध्ये कैद










