KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

एका इन्स्टा स्टोरीची किंमत जीव देऊन चुकवावी लागली! मेहकर तालुक्यात पिता-पुत्राला मारहाण; वडिलांचा मृत्यू, १५ आरोपी अटकेत, २० जणांविरुद्ध गुन्हा

On: November 12, 2026 1:17 PM
Follow Us:
इन्स्टाग्राम स्टोरीच्या वादातून मेहकरमध्ये पिता-पुत्राला मारहाण, वडिलांचा मृत्यू

मेहकर | माधव भांदुर्गे 

KattaNews जाहिरात 1

सोशल मीडियावरील एका इन्स्टाग्राम स्टोरीवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान गंभीर मारहाणीच्या घटनेत झाले. मेहकर तालुक्यातील भालेगाव येथे पिता-पुत्राला मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला आहे. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

KattaNews जाहिरात 2

नीलेश अशोकराव निकम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर भालेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

KattaNews जाहिरात 3

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नीलेश निकम यांचा १६ वर्षीय मुलगा अमरावती येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याने २ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका महापुरुषाचे छायाचित्र आणि वादग्रस्त मजकूर असलेली स्टोरी पोस्ट केली होती. ही स्टोरी २४ तासांनंतर आपोआप डिलीट झाली.

KattaNews जाहिरात 4

मात्र, या स्टोरीवरून ३ ऑक्टोबर रोजी मेहकर येथील एका युवकाने संबंधित विद्यार्थ्याला फोन करून जाब विचारल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावेळी विद्यार्थ्याने आपली चूक मान्य करून माफी मागितली होती. तरीही मेहकर येथे आल्यावर दाखवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

१० नोव्हेंबर रोजी दुपारी विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी मेहकर येथे संबंधित युवकांची भेट घेतली. समजूत काढून माफी मागत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ, असे उत्तर मिळाल्याचा आरोप आहे.

त्याच दिवशी दुपारी एका युवकाने विद्यार्थ्याला फोन करून माफी मागितल्यामुळे यावेळी सोडत असल्याचे सांगितले होते. यापुढे अशी चूक करू नको, असेही सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. मात्र, त्यानंतर काही तासांतच परिस्थिती गंभीर बनल्याचे समोर आले आहे.

१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान काही युवक मोटारसायकलींवरून विद्यार्थ्याच्या घरासमोर आले. त्यांनी विद्यार्थ्याला घराबाहेर बोलावले. यावेळी त्याच्यासह वडील नीलेश निकम यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यानंतर पिता-पुत्राला गावातील वाटिका परिसरात महापुरुषाच्या पुतळ्याजवळ नेण्यात आले. तेथे पुन्हा माफी मागण्यास सांगून दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मारहाण सुरू असताना विद्यार्थ्याने वडिलांच्या छातीत दुखत असल्याचे सांगून त्यांना मारहाण करू नये, अशी विनंती केल्याचा आरोप आहे. मात्र, तरीही मारहाण सुरूच राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेदरम्यान विद्यार्थ्याने माफी मागत असतानाचा व्हिडिओ काही युवकांनी चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, नीलेश निकम यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्यांना चारचाकी वाहनातून मेहकर येथील गाभणे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे विद्यार्थ्याला मोठा मानसिक धक्का बसला. त्याने ११ नोव्हेंबर रोजी मेहकर पोलिसांत तक्रार दाखल केली.

विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी २० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्रीच १५ आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेता अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी भालेगाव येथे भेट दिली. दोन्ही अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गावात तणावाचे वातावरण असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार करीत आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवरून सुरू झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मेहकर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता, मारहाणीतील प्रत्येकाची भूमिका आणि मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

सोशल मीडियावरील वादातून हिंसाचार होणे ही गंभीर बाब आहे. कोणत्याही पोस्टवर आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने तक्रार करणे अपेक्षित आहे. वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊ नये, हीच या घटनेतून समोर येणारी महत्त्वाची बाब आहे.


✅ कट्टा न्यूज WhatsApp ग्रुप जॉइन करा


संबंधित बातम्या:

कट्टा न्यूज – आपल्या भागाचा आवाज!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पेनटाकळी धरणाच्या पाणीवाटपावरून प्रतापराव जाधव, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, संजय रायमुलकर आणि रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय भूमिकांचे विश्लेषण

पाणी मिळाले, पण राजकीय पोळी भाजली कुणाची?पेनटाकळीच्या संघर्षाचा राजकीय पंचनामा!

धाड बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरी प्रकरणाचा तपास करणारे धाड पोलीस

धाड बसस्थानकात महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी; एका तासात 4 महिला आरोपींचा शोध, 94 हजारांच्या चोरीचा उलगडा

बुलढाण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री चोरीचा प्रयत्न करणारे चड्डी गँगचे चार संशयित CCTV फुटेजमध्ये कैद

बुलढाण्यात रात्री २ वाजता चड्डी गँगचा धुमाकूळ! भिंतीला छिद्र पाडून घरात शिरण्याचा प्रयत्न; लक्ष्मीपूजनाच्या रात्री दोन घरांना टार्गेट, चौघे CCTV मध्ये कैद

घाटबोरी सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत

घाटबोरी वनक्षेत्रातील सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत; न्यायालयाकडून ३ दिवसांची वनकोठडी

बुलढाणा न्यायालयाने चिखलीतील बालिका अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास सुनावला

बुलढाणा न्यायालयाचा मोठा निर्णय! चिखलीतील ८ वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

सुलतानपूर येथे मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून रोकड आणि शासकीय लॅपटॉपची बॅग चोरी

सुलतानपुरात वाहतूक कोंडीत संधी साधली! मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून ५० हजारांची रोकड, शासकीय लॅपटॉप चोरीला

Leave a comment