हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दिव्यांग मुलीच्या अर्थसाह्यासाठी लाच! महिला व बालविकास विभागाचा संरक्षण अधिकारी रंगेहात अटकेत

On: June 27, 2026 2:34 PM
Follow Us:
महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकाऱ्याला दिव्यांग मुलीच्या अर्थसाह्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली

बुलढाणा,प्रतिनिधी | विशाल गवई

शासनाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसाह्य सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तुषार रमेश राणे (वय ३६) हे महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे संग्रामपूर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार होता. तर जगन्नाथ तुकाराम भिवटे (वय ४०) हा नांदुरा येथील महिला व बालविकास विभागात बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

तक्रारदाराच्या दिव्यांग व निराधार मामेबहिणीला शासनाच्या क्रांतीज्योती बालसंगोपन योजना तसेच विशेष योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत मिळाली होती. ही मदत मिळवून दिल्याचा मोबदला आणि भविष्यातही अर्थसाह्य सुरू ठेवण्यासाठी आरोपींनी २४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपींनी मागितलेल्या रकमेपैकी १२ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार २५ जून रोजी जळगाव जामोद येथील तालुका शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समिती कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. आरोपींनी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाण्याचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.


वाचकांसाठी सूचना

भ्रष्टाचारासंबंधी कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा. लाच देऊ नका आणि भ्रष्टाचाराविरोधात पुढाकार घ्या.


Related News


📲 Kattanews.in ला फॉलो करा

राज्य, देश, गुन्हे, राजकारण, रोजगार, शेती आणि ब्रेकिंग न्यूजचे अचूक व विश्वासार्ह अपडेट्स मिळवण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि आपल्या मित्रांसोबत ही बातमी शेअर करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

विदर्भातील शेतकरी-शेतमजुरांसाठी राहुल गांधींना सुबोध सावजींचे आमंत्रण

विदर्भातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी यावे; सुबोध सावजींची ‘किसान एवं खेत मजदूरों की आवाज’ कार्यक्रमाची मागणी

केंद्रीय मंत्र्यांच्या गावाला जाणारी मोडकळीस एसटी बस, तारांनी बांधलेला पत्रा

केंद्रीय मंत्र्यांच्या मूळ गावाला जाणारी एसटीच मोडकळीस; तारांनी बांधलेली, पत्र्याच्या ठिगळाची बस… म्हणावी की धोक्याची सफर ?

सिंदखेडराजा शेतकरी नुकसान भरपाई निवेदन देताना डॉ. शशिकांत खेडेकर आणि पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

वीज नाही म्हणून पीक जळालं तरी मदत मिळणार? सिंदखेडराजा शेतकरी नुकसान भरपाईचा मोठा निर्णय होणार का?

Leave a comment