KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

धाड बसस्थानकात महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी; एका तासात 4 महिला आरोपींचा शोध, 94 हजारांच्या चोरीचा उलगडा

On: November 10, 2026 1:59 PM
Follow Us:
धाड बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरी प्रकरणाचा तपास करणारे धाड पोलीस

धाड, बुलढाणा | भागवत गायकवाड 

KattaNews जाहिरात 1

बसस्थानक धाड येथे महिलेच्या बॅगेतून सुमारे 94 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याच्या घटनेचा धाड पोलिसांनी अवघ्या एका तासात उलगडा केला. या प्रकरणात चार महिला आरोपी निष्पन्न झाल्या असून, चोरीस गेलेली सोन्याची मणी-मंगळसूत्राची पोत पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत धाड येथील सतर्क नागरिकांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

KattaNews जाहिरात 2

पोलीस स्टेशन धाड हद्दीतील बसस्थानक येथे 9 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास सौ. रेखा संजय विसपुते यांच्या बॅगेतून सोन्याची मणी-मंगळसूत्राची पोत आणि एक ग्रॅम गोल्डची पोत असा एकूण 94 हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

KattaNews जाहिरात 3

या घटनेनंतर पोलीस स्टेशन धाड येथे अप. क्र. 435/2026, कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धाड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

KattaNews जाहिरात 4

तपासादरम्यान धाड येथील सतर्क नागरिक विशाल विसपुते आणि प्रदीप टाकसाळ यांनी दिलेली माहिती व सहकार्य पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या मदतीने पोलिसांनी वेगाने तपास करत घटनेनंतर अवघ्या एका तासाच्या आत गुन्ह्याची उकल केली आणि चार महिला आरोपी निष्पन्न केल्या.

या प्रकरणात श्रुती रोहित कटटी (वय 30 वर्षे), अर्चिता सिनु कटटी (वय 20 वर्षे), इंदु रामु कटटी (वय 25 वर्षे) आणि अक्षता राजु कटटी (वय 20 वर्षे) या चार महिला आरोपी निष्पन्न झाल्या आहेत. सर्व आरोपी गणपती मंदिरामागे, जाफ्राबाद, तालुका जाफ्राबाद, जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, आरोपींच्या अंगझडतीदरम्यान चोरीस गेलेली अंदाजे 7 ग्रॅम वजनाची सोन्याची मणी-मंगळसूत्राची पोत पोलिसांनी तात्काळ जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस स्टेशन धाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सोनुने, महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया गोमलाडू तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

धाड बसस्थानकातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा एका तासात उलगडा होण्यात नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे ठरले. पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वयामुळे गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होते, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले.

पोलीस स्टेशन धाडच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा घालता येऊ शकतो.

धाड बसस्थानकातील चोरी प्रकरणात पोलिसांची तत्पर कारवाई आणि नागरिकांचे सहकार्य चर्चेचा विषय ठरले आहे.


📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी कट्टा न्यूजच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 कट्टा न्यूज WhatsApp ग्रुप जॉइन करा

🔴 आपल्या परिसरातील बातम्या, घटना आणि माहिती कट्टा न्यूजपर्यंत पोहोचवा. स्थानिक बातम्यांसाठी कट्टा न्यूजला नियमित भेट द्या!


संबंधित बातम्या

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथे मोकाट जनावरांच्या समस्येचे प्रतीकात्मक छायाचित्र

वनरक्षक होण्याचे स्वप्न अधुरेच! देऊळगाव राजात मोकाट गायीच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

बुलढाण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री चोरीचा प्रयत्न करणारे चड्डी गँगचे चार संशयित CCTV फुटेजमध्ये कैद

बुलढाण्यात रात्री २ वाजता चड्डी गँगचा धुमाकूळ! भिंतीला छिद्र पाडून घरात शिरण्याचा प्रयत्न; लक्ष्मीपूजनाच्या रात्री दोन घरांना टार्गेट, चौघे CCTV मध्ये कैद

पेनटाकळी धरणाच्या पाणीप्रश्नावर सिद्धार्थ खरात, प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर आणि श्वेता महाले यांच्या भूमिका दर्शवणारे राजकीय विश्लेषण

पेनटाकळीच्या पाण्यात राजकारणाचे प्रतिबिंब! कुणी जनतेचा कैवारी ठरला, तर कुणी श्रेयाच्या स्पर्धेत उतरला ?

मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बस अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बसच्या धडकेत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

वरुडी ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद साजरा करताना पदाधिकारी

सिंदखेडराजा तालुक्यातील वरुडी गावाचा राज्यस्तरावर गौरव! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर.

घाटबोरी सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत

घाटबोरी वनक्षेत्रातील सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत; न्यायालयाकडून ३ दिवसांची वनकोठडी

Leave a comment