हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

५०-६० वर्षे राहूनही न्याय नाही! चिखलीतील कुटुंबांचा आक्रोश, बावनकुळे यांच्याकडे मोठी मागणी

On: April 22, 2026 3:02 PM
Follow Us:
चिखली मातंगपुरा अतिक्रमण नियमितीकरण व घरकुल योजना मागणी

चिखली |विशाल गवई

चिखली शहरातील मातंगपुरा, पोलीस लाईनलगत व एकता नगर येथील रहिवाशांनी अतिक्रमण नियमितीकरण, घरकुल योजना आणि मूलभूत सुविधा मिळण्यासाठी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना अद्याप जमीन हक्क मिळाले नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते छोटु कांबळे यांनी हा प्रश्न पुढे आणत चिखली तहसील कार्यालयात निवेदन दिले. यावेळी प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन निर्णय असूनही त्यांना अजूनही घरकुल, रस्ते, पाणी व स्ट्रीट लाईट यांसारख्या सुविधा मिळालेल्या नाहीत.

निवेदनात नमूद करण्यात आले की, या भागातील अनेक कुटुंबे दशकांपासून राहत असूनही त्यांना मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत. त्यामुळे नगर परिषद विकास आराखडा बदलून संबंधित जागेवरील आरक्षण रद्द करून नागरिकांना अधिकृत हक्क द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना नियमित करण्याचा शासनाचा निर्णय असताना देखील या रहिवाशांना त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे तातडीने अतिक्रमण नियमित करून घरकुल योजना लागू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

“अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांना अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणे हा मोठा अन्याय आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी भावना छोटु कांबळे यांनी व्यक्त केली.

👉 अशाच महत्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि WhatsApp ग्रुप जॉईन करा!

Related News:

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक

बुलढाणा | धाड पेट्रोल पंप चोरीचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; आरोपी जेरबंद, ₹1.05 लाखांची संपूर्ण रक्कम जप्त

बुलढाण्यात २९ जुलै २०२६ रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आयोजित जिल्हास्तरीय महामोर्चा

२९ जुलैला बुलढाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात जिल्हास्तरीय महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार

खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट बाहेर काढताना मजुराचा मृत्यू; अवैध वाळू उपशाचा संशय

जास्तीच्या मजुरीच्या आमिषाने गेला जीव! खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट काढताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात

लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने 26 वस्तूंच्या किटची माहिती देताना एकनाथ शिंदे

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! आषाढी एकादशीला 26 वस्तूंचे किट; एकनाथ शिंदे यांनी सांगितली संपूर्ण माहिती

बुलढाण्यात धाड पोलिसांनी 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आणि आयशर वाहन जप्त करत मोठी कारवाई केली.

गरीबांच्या ताटातील घास लुटण्याचा प्रयत्न? बुलढाण्यात 41 क्विंटल सरकारी रेशनचा तांदूळ जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

चिखली पोलिसांची मोठी कारवाई, MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध आणि दोघांना तडीपार

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, दोघांना 3 महिन्यांसाठी तडीपार

Leave a Comment