हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Big Update: 190 मतांनी पलटला खेळ! ग्रामसभेत नलिनी गरड यांना जनतेचा कौल, अविश्वास ठराव नामंजूर

On: April 21, 2026 2:47 PM
Follow Us:
खैरव-बारलिंगा ग्रामसभेत अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर गुलाल उधळून आनंद व्यक्त करताना नागरिक

सिंदखेडराजा/समाधान सरकटे 

खैरव-बारलिंगा ग्रामसभा, अविश्वास ठराव, नलिनी गरड या मुद्द्यांवर सध्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत सरपंच सौ. नलिनी गरड यांच्याविरोधात मांडलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत मोठ्या फरकाने फेटाळण्यात आला. 190 मतांनी जनतेने सरपंचांच्या बाजूने कौल दिल्याने राजकीय समीकरणेच बदलली आहेत.सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत 30 मार्च रोजी उपसरपंचासह 9 सदस्यांनी सरपंच सौ. नलिनी गरड यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता. हा ठराव सदस्यांनी मंजूरही केला होता, त्यामुळे गावात राजकीय वातावरण तापले होते.

मात्र सरपंच थेट जनतेतून निवडून आल्यामुळे तहसीलदार अजित दिवटे यांनी 16 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले आणि इथेच चित्र पूर्णपणे बदलले.

अविश्वास ठरावाच्या बाजूने 151 मते पडली, तर विरोधात तब्बल 190 मते पडली. त्यामुळे 39 मतांच्या फरकाने हा ठराव नामंजूर ठरला आणि सरपंच सौ. नलिनी राजेंद्र गरड यांचे पद कायम राहिले.

यापूर्वी सदस्यांनी सरपंचांवर अनेक गंभीर आरोप केले होते. निर्णय प्रक्रियेत सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, विकासकामांमध्ये अनियमितता आहे, प्रशासनात पारदर्शकता नाही, तसेच सदस्यांशी असहकार्य अशी तक्रारी करण्यात आल्या होत्या.

तथापि ग्रामसभेत जनतेने सरपंचांवर विश्वास दाखवत सर्व आरोपांना अप्रत्यक्षरित्या नाकारले. निकाल जाहीर होताच उपस्थित नागरिकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला आणि गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

या निकालामुळे खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा स्थैर्य निर्माण झाले असून, पुढील काळात विकासकामांना गती मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


📢 हे आवश्यक करा..

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KATTANEWS.IN ला दररोज भेट द्या.
👉 ही बातमी शेअर करा आणि आपल्या भागातील अपडेट्स सर्वांपर्यंत पोहोचवा.


🔗 Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे मनसेचे निवेदन

देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेचा तहसीलदारांना इशारा

बुलढाण्यातील पळसखेड चक्का येथील मुंढे परिवारातील दोन चुलते-पुतण्यांच्या निधनाची बातमी

एकाच परिवारातील दोन आधारवड हरपले; देशसेवेतील सुभेदार पुत्र वडिलांच्या अखेरच्या निरोपापासून दूर

बुलढाणा जिल्हा बँक निवडणूक - अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अविरोध निवड

बुलढाणा जिल्हा बँक निवडणूक: ‘किंग इज बॅक’ म्हणत डॉ. राजेंद्र शिंगणे अध्यक्षपदी अविरोध, १८ वर्षांची प्रशासकीय राजवट संपली

चिखलीतील दहीहंडी उत्सवात प्रतापराव जाधव आणि विद्याधर महाले यांची गळाभेट

एकीकडे गायकवाड-महाले संघर्ष, दुसरीकडे प्रतापरावांची ‘जादू की झप्पी’; बुलढाण्यात नेमकं काय घडतंय?

सिंदखेडराजात मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्याची मागणी करताना वैशाली नागवडे

सिंदखेडराजात मंत्रिमंडळाची विशेष बैठक घ्या; जिजाऊंच्या जन्मभूमीच्या विकासासाठी वैशाली नागवडेंचा आग्रह

मेहकर बायोडिझेल जप्त कारवाई करताना पुरवठा अधिकारी

मेहकर, सिंदखेडराजामध्ये बायोडिझेल जप्त: पेट्रोल पंपांवर पुरवठा विभागाचा धडक छापा

Leave a Comment