हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जास्तीच्या मजुरीच्या आमिषाने गेला जीव! खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट काढताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात

On: July 21, 2026 5:37 PM
Follow Us:
खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट बाहेर काढताना मजुराचा मृत्यू; अवैध वाळू उपशाचा संशय
मेरा बु. | सुनिल अंभोरे 

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जास्तीच्या मजुरीचे आमिष दाखवून नदीपात्रात उतरविण्यात आलेल्या मजुराचा बुडालेली बोट बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले असून अवैध वाळू उपसा, निष्काळजीपणा आणि मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा तपास सुरू केला आहे.

ही घटना किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-पिपळगाव कुडा गावालगत असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदीपात्रात घडली. या परिसरात काही काळापासून बोटीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या कारवाईची चाहूल लागताच संबंधितांनी वापरात असलेली बोट नदीपात्रात बुडवून घटनास्थळ सोडल्याची माहितीही समोर येत आहे.

त्यानंतर बुडालेली बोट बाहेर काढण्यासाठी गुंजाळा येथील काही मजुरांना अधिक मजुरीचे आमिष दाखवून नदीपात्रात उतरविण्यात आले. बोट बाहेर काढण्याचे काम सुरू असताना तिघे मजूर सुरक्षित बाहेर आले; मात्र राजेंद्र आश्रुजी इलग हे वर आले नाहीत. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. मात्र अनेक तास शोध घेऊनही त्यांचा मागमूस लागला नाही. सुमारे २४ तास उलटल्यानंतरही ते सापडले नसल्याने त्यांच्या मुलाने किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यंत्राच्या सहाय्याने नदीपात्रातील बुडालेली बोट बाहेर काढण्यात आली. त्यावेळी बोटीखाली दबलेल्या अवस्थेत राजेंद्र आश्रुजी इलग यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिक चौकशीत या संपूर्ण प्रकारामागे अवैध वाळू उपशाशी संबंधित हालचालींचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारावर तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा, बेकायदेशीर वाळू उपसा आणि मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, खडकपूर्णा प्रकल्प परिसरात अवैध वाळू उपशाच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या. त्यामुळे या घटनेनंतर संबंधित वाळू माफियांवर आणि जबाबदार व्यक्तींवर प्रशासन कोणती कठोर कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.hatsApp Group जॉईन करा

📢 KattaNews.in WhatsApp चॅनेल जॉईन करा

महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती, हवामान, नोकरी, शिक्षण आणि जिल्हानिहाय महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा.

👉 WhatsApp Group Join Now

📌 संबंधित बातम्या

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

महाराष्ट्रातील आजचे हवामान आणि पावसाचा अंदाज

आजचे हवामान : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल; ‘या’ भागांत मेघगर्जनेसह सरी, IMDचा ताजा अंदाज

शेगावमध्ये महालक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी आलेले व्यावसायिक विकास वाणी यांचा खामगावात मृत्यू

शेगावमध्ये महालक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी आलेल्या व्यावसायिकाचा खामगावात मृत्यू; नातेवाईकांची खुनाच्या चौकशीची मागणी

डोणगावातील दोन मित्रांचा नागापूर पुलाजवळ अपघातात मृत्यू

दोन जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू; डोणगावात एकाच वेळी अंत्यविधी

कल्याणी अमोल भाकरे यांना राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार

कल्याणी अमोल भाकरे यांना मोठा सन्मान; राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पत्रकार छोटू कांबळेंना पत्रकारिता पुरस्कार २०२६ जाहीर झाल्यानंतर प्रतापराव जाधवांच्या हस्ते सत्कार

पत्रकार छोटू कांबळेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६; प्रतापराव जाधवांच्या हस्ते सत्कार

मोताळ्यात महावितरणविरोधात आमरण उपोषण करताना पृथ्वीराज गायकवाड

महावितरणच्या मनमानीविरोधात मोताळ्यात आमरण उपोषण; पृथ्वीराज गायकवाड मैदानात

Leave a Comment