हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा | धाड पेट्रोल पंप चोरीचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; आरोपी जेरबंद, ₹1.05 लाखांची संपूर्ण रक्कम जप्त

On: July 22, 2026 6:02 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक

बुलढाणा |भागवत गायकवाड 

धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली ₹1 लाख 5 हजारांची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे. जलद तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत गुन्ह्याचा छडा लावला.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू ठेवला.

या तपासात स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय 19, रा. मरमोंढाळा, ता. जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपीकडून चोरीस गेलेली ₹1,05,000 इतकी संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली. त्यामुळे फिर्यादीचे मोठे आर्थिक नुकसान टळले.

ही घटना करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपावर घडली होती. फिर्यादी खंडू संतोषराव भोंडे (रा. म्हसला बु., ता. जि. बुलढाणा) यांच्या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 273/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या यशस्वी कारवाईत अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशीष रोही, PSI प्रताप बाजड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस ठाणे करीत असून आरोपीकडून इतर गुन्ह्यांबाबतही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


📲 KattaNews.in WhatsApp ग्रुप जॉईन करा

बुलढाणासह महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती, नोकरी, शिक्षण आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.


संबंधित बातम्या

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

गणेशोत्सवातील डीजे बंदीवर सवाल उपस्थित करताना आमदार श्वेता महाले

गणेशोत्सवातच डीजे बंदी का? श्वेता महाले यांचा प्रशासनाला थेट सवाल; म्हणाल्या, ‘बंदी तर सरसकट घाला!’

ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

२५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा मोठा सन्मान; ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार

स्कूल बसच्या सुरक्षेसाठी नवीन नियमावली आणि तीन महिन्यांची मुदत

स्कूल बसच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; शाळांना ३ महिन्यांची मुदत, नियम न पाळल्यास परवाना रद्द

माळवंडीतील शेतरस्ता अडवल्याप्रकरणी गणेश आमले यांचे निवेदन

शेतरस्ता अडवल्याने शेतकऱ्याची न्यायासाठी महसूलमंत्र्यांकडे धाव; विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही निवेदन

महाराष्ट्रातील आजचे हवामान आणि पावसाचा अंदाज

आजचे हवामान : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल; ‘या’ भागांत मेघगर्जनेसह सरी, IMDचा ताजा अंदाज

शेगावमध्ये महालक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी आलेले व्यावसायिक विकास वाणी यांचा खामगावात मृत्यू

शेगावमध्ये महालक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी आलेल्या व्यावसायिकाचा खामगावात मृत्यू; नातेवाईकांची खुनाच्या चौकशीची मागणी

Leave a Comment