Advertisement
लोणार / विनायक कुटे
समतेचा सूर्य मावळला हा संदेश आजही समाजमनाला जागं करतो आणि या भावनेतून लाखो पिढ्यांना दिशा मिळते. महापरिनिर्वाण दिनी आयोजित अभिवादन सभेत डॉ. गोपाल बच्छीरे यांनी जोर देऊन सांगितले की समतेचा सूर्य मावळला असला तरी बाबासाहेबांनी दिलेला प्रकाश येणाऱ्या पिढ्यांना सदैव मार्गदर्शक ठरेल.०६ डिसेंबर १९५६ रोजी जगातील खऱ्या अर्थाने समतेचा सूर्य मावळला, मात्र पुढील लाखो पिढ्यांसाठी पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला, असे भावनिक वक्तव्य अभिवादन सभेत डॉ. गोपाल बच्छीरे यांनी केले. भीमनगर बुद्ध विहार येथे कॅन्डल मार्चच्या समारोपानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, गौतम बुद्धांच्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वांवर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली. त्यांनी दलित, पददलित, बहुजन, अल्पसंख्यांक यांच्यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री जातीचा सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर उद्धार केला.एकेकाळी स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा, समतेचा आणि विधवेला जगण्याचा हक्क नव्हता; पण संविधानामुळे हे सर्व हक्क स्त्रियांना मिळाले आणि आज भारतात विधवा स्त्रीही पंतप्रधान होऊ शकते याचे श्रेय बाबासाहेबांनाच जाते.या सभेत श्री. गजानन जाधव, श्री. सुदन अंभोरे यांनीही आपल्या विचारांद्वारे बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे आयोजन तानाजी अंभोरे यांनी केले होते. यावेळी लूकमान कुरेशी, शेख सादिक, योगेश भुक्कन, ओवेस कुरेशी, अशपाक खान, फहीम खान, इक्बाल कुरेशी, उमेश मोरे, अशोक मोरे, डॉ. रंजना बच्छिरे, पार्वतीताई सुटे, शालिनीताई मोरे, रोशन अंभोरे, किशोर बच्छिरे, समर्जीत बच्छिरे, अनिल मोरे, अशोक सरदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी अंभोरे यांनी केले तर आभार उमेश मोरे यांनी मानले.
👉 अजून स्थानिक + ब्रेकिंग अपडेट्ससाठी KattaNews.in फॉलो करा!