हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणारमध्ये गुरुचरित्र व अखंड नामजप सप्ताहाची भव्य सांगता – हजारो भाविकांची उसळलेली गर्दी!

On: December 7, 2025 7:37 AM
Follow Us:
लोणार गुरुचरित्र सप्ताह भव्य सांगता आणि भाविकांची गर्दी

लोणार प्रतिनिधी / विनायक कुटे

लोणारच्या समर्थ नगर येथे दिडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंतीनिमित्त आयोजित गुरुचरित्र व अखंड नामजप सप्ताहाची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात झाली. या दिवशी अखंड गुरुचरित्र व अखंड नामजप कार्यक्रमाचा समारोप महाआरती व महाप्रसादाने पार पडला.
हजारो भाविक या दिवशी गुरुचरित्र व अखंड नामजप सप्ताहाच्या सांगतेसाठी उपस्थित होते. भक्तांनी दिवसभर सुरू असलेल्या गुरुचरित्र व अखंड नामजप जपयज्ञात सहभाग घेऊन आध्यात्मिक समाधान अनुभवले.दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा – आध्यात्मिक विकास मार्ग संचालित समर्थ नगर केंद्रात दत्त जयंती निमित्त अखंड नामजप, अखंड स्वामी चरित्र वाचन, अखंड विणावादन, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, दैनंदिन नित्यस्वाहकार आणि त्रिकाल आरती असे अनेक धार्मिक कार्यक्रम सात दिवस राबविण्यात आले.
या सात दिवसीय कार्यक्रमात प्रथमच लोणारमध्ये २०१ जणांनी एकत्र येऊन गुरुचरित्र पारायण केले. हा आध्यात्मिक उपक्रम स्थानिक भक्तांसाठी मोठा प्रेरणादायी ठरला. महाआरतीच्या वेळी परिसर भक्तिरसाने भरून गेला आणि मोठ्या संख्येने लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला.समर्थ नगरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मांदियाळी महाप्रसाद’ आयोजित करण्यात आला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रात अन्नाची तयारी केली जात नाही; प्रत्येक सेवेकरी आपल्या घरून रोटी, भाजी, मिठाई किंवा अन्नपदार्थ घेऊन येतो आणि सर्व अन्नपदार्थ एकत्र करून महाराजांना नैवेद्य अर्पण केला जातो. नंतर हा प्रसाद हजारो भाविकांना वितरित केला जातो.
या सेवेचे संचालन डॉ. सुशील अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.या धार्मिक सोहळ्यामुळे लोणार परिसरात भक्ती, सेवा आणि सामूहिक आध्यात्मिकता यांचे सुंदर दर्शन घडले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तीत आणि सेवाभावाने पार पडला.
 
 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचे पथसंचलन

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; पथसंचलनातून दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

चिखली गांजा जप्त कारवाईत बुलढाणा पोलिसांनी जप्त केलेला गांजा आणि अटक करण्यात आलेला आरोपी

चिखलीत २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त; एकाला अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत पोलिसांची कारवाई

Leave a Comment