हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणार ते पहुर एसटी बस बंद; विद्यार्थ्यांचे पेपर धोक्यात, पालकांचा संताप वाढला.

On: December 3, 2025 9:18 PM
Follow Us:
रिसोड–मेहकर महामार्गावरील अर्धवट रस्त्यामुळे बंद ST बस सेवा

लोणार प्रतिनिधी/विनायक कुटे 

लोणार ते पहुर एसटी बस सेवा अचानक बंद झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

लोणार ते पहुर एसटी बस अनेक वर्षांपासून नियमित धावत होती, परंतु अचानक ही सेवा बंद करण्यात आली.
यामुळे १०वी, ११वी आणि १२वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर थेट धोक्यात आले आहेत. त्यामुळे
लोणार ते पहुर एसटी बस तातडीने सुरु करण्याची मागणी जोरात होत आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की लोणार ते पहुर एसटी बस बंद केल्याने परीक्षा काळात मुलांना थंडीमध्ये पायपीट करावी लागते.

थंडीच्या सकाळी विद्यार्थी आरडव येथे पायी येताना दिसत आहेत. यामुळे अनेकजण शाळा आणि कॉलेजपासून वंचित राहात आहेत.
सत्यभामाबाई मुंढे यांनी प्रशासनाला लेखी निवेदन देत तात्काळ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, वेळोवेळी कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना अर्ज देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही.
यापूर्वी बुलडाणा येथे आंदोलनानंतर बस सुरू करण्यात आली होती, परंतु डीएम यांच्या आदेशानुसार पुन्हा ही बस बंद झाली.

यामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये संताप वाढला असून ७ दिवसांत बस सेवा सुरु न झाल्यास मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

📢 आपले मत काय?

लोणार–पहुर एसटी बस बंदीबाबत तुमचे काय मत आहे?
खाली कमेंटमध्ये नोंदवा आणि KattaNews.in सोबत जोडलेले रहा.

📩 तक्रार/माहिती पाठवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment