हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कर्तव्यावर निघालेल्या एसटी बसचालकाचा भीषण अपघातात मृत्यू; भरधाव बोलेरोची जोरदार धडक

On: July 4, 2026 9:43 AM
Follow Us:
कर्तव्यावर निघालेल्या बुलढाणा आगारातील एसटी चालक रमेश उबरहंडे यांचा बोलेरोच्या धडकेत मृत्यू

बुलढाणा | प्रतिनिधी – विशाल गवई

कर्तव्यावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या एसटी बसचालकाचा प्रवास कायमचा थांबला. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकाजवळ भरधाव बोलेरोने दिलेल्या जोरदार धडकेत एसटी चालक रमेश सर्जेराव उबरहंडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बुलढाणा आगारासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मूळचे पांग्री उबरहंडे येथील रहिवासी असलेले रमेश सर्जेराव उबरहंडे (वय ५६) हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा आगारात चालक म्हणून कार्यरत होते. सध्या ते बुलढाणा शहरातील सागवन परिसरातील धाड नाक्याजवळ राहत होते.

३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ते एमएच-२८-बीडी-२३३४ क्रमांकाच्या स्कुटीवरून कर्तव्यावर हजर होण्यासाठी बुलढाणा आगाराकडे निघाले होते. त्यादिवशी त्यांची बुलढाणा-मेहकर या मार्गावरील बसवर चालक म्हणून ड्युटी होती.

जयस्तंभ चौकाजवळील हिरोळे पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने आलेल्या एमएच-२८-बीबी-३४३० क्रमांकाच्या बोलेरोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते बोलेरोच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत चालकाचे पुत्र अनिकेत रमेश उबरहंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोलेरो चालक अनिल बाळू बरडे (रा. जुना गाव, भीलवाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रणजित हिवाळे पुढील तपास करत आहेत.

रमेश उबरहंडे यांच्या पार्थिवावर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शहरातील त्रिशरण चौक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे बुलढाणा आगारातील चालक-वाहक, अधिकारी-कर्मचारी तसेच पांग्री गावातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, मुलगी, जावई आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.


वाचकांसाठी महत्वाचे 

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, जिल्हानिहाय ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, भरती, शेती, शिक्षण आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी शेअर करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा.


Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

Leave a comment