KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

साखरखेर्डा परिसरात पाझर तलावांचा पाणीसाठा धोक्यात! वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, उपसा मात्र सुरूच

On: November 22, 2026 1:24 AM
Follow Us:
साखरखेर्डा परिसरातील पाझर तलाव आणि वन्यजीवांसाठी पाणीसाठ्याचा प्रश्न

साखरखेर्डा |समाधान सरकटे 

KattaNews जाहिरात 1

साखरखेर्डा परिसरातील पाझर तलाव आणि सिंचन तलावांमध्ये यंदा अल्प पावसामुळे अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असताना काही तलावांमधून अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे या पाण्यावर वन्यप्राण्यांची तहान भागविण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना दुसरीकडे सुरू असलेल्या पाणी उपशामुळे तलावांमधील शिल्लक साठाही संपण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाझर तलावांमधील पाणी वन्यजीवांसाठी राखीव ठेवून सुरू असलेला पाणी उपसा तातडीने बंद करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

KattaNews जाहिरात 2

साखरखेर्डा परिसरातील अनेक गावांमध्ये पाझर तलाव आणि सिंचन तलाव आहेत. या तलावांमध्ये परिसरातील पाळीव जनावरांसह वन्यप्राण्यांचीही तहान भागते. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने एकही पाझर तलाव किंवा सिंचन तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. त्यामुळे उपलब्ध असलेला मर्यादित पाणीसाठा जपण्याची गरज निर्माण झाली आहे.

KattaNews जाहिरात 3

या परिसरात रोही, हरीण, रानडुक्कर, ससा आणि मोर यांसारखे विविध वन्यप्राणी आढळतात. पाण्याचे नैसर्गिक स्रोत कमी होत असताना हे प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी तलावांवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत तलावांमधील पाणी वन्यजीवांसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती.

KattaNews जाहिरात 4

काही तलावांमधील विद्युत मोटारी काढण्यात आल्याची माहिती असली तरी परिसरातील काही तलावांमधून अद्यापही पाण्याचा उपसा सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा उपसा असाच सुरू राहिला, तर डिसेंबरअखेर अनेक तलावांमधील उर्वरित पाणीसाठाही संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी वन्यप्राण्यांसह पाळीव जनावरांनाही पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

या गंभीर परिस्थितीकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहील, याची खबरदारी घेण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

माजी सरपंच कमलाकर गवई यांनी दिलेल्या पत्रकातूनही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तलावांमधील पाणी उपसा त्वरित बंद करून वन्यप्राण्यांसाठी पाणीसाठा राखीव ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या मागणीची दखल घेऊन महसूल विभाग आणि संबंधित ग्रामपंचायत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे साखरखेर्डा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!

स्थानिक बातम्या, शेती, बाजारभाव, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

✅ WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

वाचकांसाठी महत्त्वाचे

आपल्या परिसरातील पाणीटंचाई, तलावांची स्थिती किंवा वन्यजीवांशी संबंधित काही समस्या आपल्या निदर्शनास आल्यास आम्हाला कळवा. स्थानिक प्रश्नांना व्यासपीठ देण्यासाठी KattaNews शी संपर्क साधा.

आपली बातमी, आपल्या परिसराचा आवाज!

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर गांजा जप्ती कारवाई आणि डोणगाव परिसरातील संभाव्य गांजा तस्करीची चौकशी

डोणगावातही गांजा विक्रीचे जाळे पसरले आहे का? मेहकरच्या कारवाईनंतर पोलिसांच्या चौकशीची मागणी

डोणगाव-मालेगाव मार्गावरील माता अनुसया वेअर हाऊसजवळ झालेला अपघात

डोणगाव-मालेगाव मार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

दुष्काळ अग्रिम अनुदानासाठी सामूहिक खातेदार शेतकऱ्यांना संमतीपत्र जमा करण्याचे आवाहन

दुष्काळाचे ₹5 हजार अनुदान अडकले? सामूहिक खातेदार शेतकऱ्यांसाठी प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

देऊळगावमही-खैरव रोडवर पोलिसांनी ६ वाहनांतून ४४ गोवंश जनावरांची सुटका केली

देऊळगावमही-खैरव रोडवर मध्यरात्री पोलिसांचा छापा; ६ वाहनांतून ४४ गोवंश जनावरांची सुटका

साखरखेर्डा परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त

साखरखेर्डा परिसरात महिनाभरापासून मोबाईल नेटवर्क गायब! जिओसह अनेक कंपन्यांच्या सेवेने ग्राहक त्रस्त

डोणगाव येथे पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमध्ये बंदी असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप

डोणगावात गुटख्याची खुलेआम विक्री? पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमध्ये बंदी असलेल्या गुटख्याचा सुळसुळाट

Leave a comment