दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

चिखला काकड पुतळा वाद पेटला; शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा

Follow Us:
चिखला काकड येथे शिवाजी महाराज पुतळा वादामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती

बुलढाणा|२३ फेब्रुवारी २०२६

लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे शिवाजी महाराज पुतळा वाद प्रकरणामुळे वातावरण तापले असून या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेत्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठविल्याने बुलढाणा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशी संबंधित वादामुळे राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या भूमिकेमुळे आपण अस्वस्थ झाल्याचे कायंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार सर्व समाजांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे; मात्र सध्याच्या घडामोडींमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच वंजारी समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप करत कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी भूमिका घेतली गेल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या परिस्थितीत अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक ऐक्य व समाजभावना जपण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी आपला राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


👉 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी

Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि WhatsApp वर शेअर करा.


Related News

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखलीतील तलाठी पियुष गायकवाड यांच्या आत्महत्येची बातमी

अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

साखरखेर्ड्यात भरदिवसा महिलेच्या घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न; आरडाओरड ऐकून नागरिकांनी आरोपीला पकडले

Leave a comment