हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक; निवडणुकीपर्यंत कारभार त्यांच्या हाती

On: February 22, 2026 8:11 AM
Follow Us:
सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे दृश्य

साखरखेर्डा | २२ फेब्रुवारी २०२६

सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक म्हणून काम पाहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर प्रशासन कोण सांभाळणार याबाबत संभ्रम असताना, आता निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याकडेच कारभार सोपवण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण प्रशासनात सातत्य राहणार असून विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी २० फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अंतर्गत कलम १५१ (१)(अ) व कलम १८२(१) चा वापर करून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार पुढील सहा महिने किंवा ग्रामपंचायत निवडणूक होईपर्यंत विद्यमान पदाधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील.यापूर्वी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय जबाबदारी देण्याचा आदेश होता; मात्र नव्या आदेशामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनाच अधिकार देण्यात आले आहेत. या निर्णयास राज्यपालांच्या मान्यतेसह शासन सहसचिव वर्षा भरोसे यांनीही मंजुरी दिली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा आदी मोठ्या ग्रामपंचायतींना या निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यामुळे स्थानिक विकासकामे अडथळ्याविना सुरू राहतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

साखरखेर्डा येथील सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांना सरपंचपदी निवडून केवळ दहा महिने झाले होते. शासनाच्या नव्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली असून गावातील रस्ते व नाली कामांना गती मिळावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.


हे पण वाचा..


📢 आपल्या परिसरातील बातम्या आम्हाला पाठवा

आपल्या गावातील घडामोडी, समस्या किंवा सकारात्मक बातम्या आम्हाला पाठवा. निवडक बातम्या Kattanews.in वर प्रकाशित केल्या जातील.

WhatsApp: 9561475736
Email: kattanews@gmail.com

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास क्रीडांगणाच्या जमिनीवर जमलेले युवक

साखरखेर्ड्यात सरकारी ई-क्लास जमिनीवर डल्ला? क्रीडांगण नांगरून ताबा घेण्याचा प्रयत्न; युवक संतप्त

शिंदी गावात 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

शिंदीत 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने, गावावर शोककळा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्मशानभूमीच्या प्रश्नावर बोलताना आमदार सिद्धार्थ खरात

स्मशानभूमीच्या प्रश्नावर सभागृहात आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक; मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा, स्वतंत्र धोरणाची ग्वाही

साखरखेर्ड्यात विद्यार्थिनींशी संवाद साधताना दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक द्रोपदी साळवे

साखरखेर्ड्यात दामिनी पथक ॲक्शन मोडमध्ये; टवाळखोरांना थेट इशारा, विद्यार्थिनींना दिला मोठा दिलासा

Leave a Comment