साखरखेर्डा,प्रतिनिधी | समाधान सरकटे
गावातील ज्येष्ठ नागरिक गुलाबराव माधवराव खरात (वय 78) यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाला होता. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच 9 जुलै रोजी रात्री सुमारे 8 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी गावात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली.
ही घटना ताजी असतानाच त्याच दिवशी ताराबाई भिकनसिंग राजपूत (वय 79) यांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एका दिवसात दोन ज्येष्ठ नागरिकांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली होती.
मात्र या दुःखद घटनांची मालिका येथेच थांबली नाही. आज शुक्रवार, 10 जुलै रोजी शिंदी येथील सधन कास्तकार भुजंगराव बाजीराव खरात (वय 70) यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
भुजंगराव खरात हे आठवडी बाजारासाठी साखरखेर्डा येथे येत होते. ते चिखली-साखरखेर्डा एसटी बसने प्रवास करत असताना वाटेतच त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसचे चालक व वाहक तसेच प्रवाशांनी तातडीने त्यांना साखरखेर्डा येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल मगर यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भुजंगराव खरात यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. गुलाबराव खरात यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. तर ताराबाई राजपूत यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
अवघ्या 24 तासांत तीन ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाल्याने शिंदी गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून तिन्ही कुटुंबांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.
📢 वाचकांसाठी आवाहन
आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधीच्या स्थानिक बातम्या वाचण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.
आपल्याकडे एखादी बातमी, फोटो किंवा व्हिडिओ असल्यास आमच्याशी संपर्क साधा. तुमची बातमी हजारो वाचकांपर्यंत पोहोचू शकते.
📰 Related News
- ▶ साखरखेर्ड्यात दामिनी पथक ॲक्शन मोडमध्ये; टवाळखोरांना थेट इशारा, विद्यार्थिनींना दिला मोठा दिलासा
- ▶ साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय 15 ऑगस्टपूर्वी सुरू होणार? प्रशासनाचे तातडीचे आदेश
- ▶ स्मशानभूमीच्या प्रश्नावर सभागृहात आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक; मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा, स्वतंत्र धोरणाची ग्वाही










