हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

झोपेच्या डुलकीने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी

On: February 3, 2026 8:41 AM
Follow Us:
समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ झोपेच्या डुलकीने कारचा भीषण अपघात

दुसरबीड | ३ फेब्रुवारी २०२६

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
दुसरबीड जवळील कॉरिडोर चॅनल क्रमांक 309 येथे कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटला धडकली.

या अपघातात कारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त कारचा क्रमांक MH 01 BU 9995 असून सदर कार नांदेडहून मुंबईकडे जात होती.
धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णतः चुरगळला असून अपघाताची तीव्रता मोठी होती.

या कारमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते.
यामध्ये उद्धव लादवड, गंगासागर लादवड, विजया निमवड, देवांश लादवड, वेदांत लादवड आणि प्रशांत यांचा समावेश आहे.
यापैकी चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले 108 रुग्णवाहिका चालक सुभाष पंचाळ आणि डॉ. मंगेश काळे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमींना मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा आणि दीर्घ प्रवासामुळे चालकांना थकवा येत असून, अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
वाहन चालविताना विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in वाचत रहा.

संबंधित बातम्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment