हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

On: July 22, 2026 2:48 PM
Follow Us:
उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

चिखली | विशाल गवई 

चिखली तालुक्यातील उत्रादा येथे ग्रामपंचायत कार्यालय ते जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्याचा आरोप करत गावातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घातला. अर्धवट रस्ता, मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काही प्रमाणात काम करण्यात आले असले तरी मध्यभागी असलेला मुख्य रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण मार्ग चिखलमय बनला असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलातून पायी चालावे लागत असून अनेक वेळा घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याचे पालकांनी सांगितले. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.

वारंवार तक्रारी करूनही काम पूर्ण करण्यात आले नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेराव घालत तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

📢 WhatsApp Group Join करा
महाराष्ट्रातील सर्व ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी बातम्या मिळवण्यासाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा.

Related News

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्ड्यात उभ्या सोयाबीन पिकावर नांगर फिरविणारे शेतकरी शालिग्राम नामदेव गवई

डोळ्यांसमोर उभे पीक, पण हातात काहीच नाही; शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरविला नांगर!

लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघाताचे प्रतिनिधिक छायाचित

लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींची धडक; चार तरुण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

गणेशोत्सवातील डीजे बंदीवर सवाल उपस्थित करताना आमदार श्वेता महाले

गणेशोत्सवातच डीजे बंदी का? श्वेता महाले यांचा प्रशासनाला थेट सवाल; म्हणाल्या, ‘बंदी तर सरसकट घाला!’

ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

२५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा मोठा सन्मान; ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार

स्कूल बसच्या सुरक्षेसाठी नवीन नियमावली आणि तीन महिन्यांची मुदत

स्कूल बसच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; शाळांना ३ महिन्यांची मुदत, नियम न पाळल्यास परवाना रद्द

माळवंडीतील शेतरस्ता अडवल्याप्रकरणी गणेश आमले यांचे निवेदन

शेतरस्ता अडवल्याने शेतकऱ्याची न्यायासाठी महसूलमंत्र्यांकडे धाव; विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही निवेदन

Leave a Comment