हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

७६ व्या वर्षी न्यायासाठी अन्नत्याग! रस्त्यासाठी गुरुजींचे सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

Follow Us:
सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर ७६ वर्षीय गुरुजींचे अन्नत्याग उपोषण

विशेष प्रतिनिधी | बुलढाणा २९ जानेवारी २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा या गावातील पंचक्रोशीत परिचित असलेले ७६ वर्षीय निवृत्त प्राथमिक शिक्षक गंभीरराव गुरुजी खरात यांनी शेतवाट खुली करण्याच्या मागणीसाठी अखेर अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजल्यापासून ते सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले असून प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

गेल्या जवळपास दोन वर्षांपासून पुरातन वहिवाटीच्या शेतवाटेचा प्रश्न प्रलंबित असून या संदर्भात त्यांनी तहसीलदार सिंदखेडराजा यांच्याकडे वारंवार अर्ज सादर केले आहेत. मात्र अर्जावर केवळ तारीख पे तारीख सुरू असून आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. न्याय मिळत नसल्याने अखेर अन्नत्याग उपोषणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

संपूर्ण पंचक्रोशीत गंभीरराव गुरुजी यांना ओळखत नाही असे एकही गाव नाही. आयुष्यभर ब्रह्मचर्य स्वीकारून त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक सेवा बजावली. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले, त्या प्रत्येक गावात पालक व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या शैक्षणिक कार्यातून अनेक विद्यार्थी घडले असून ते आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले जीवन अध्यात्म क्षेत्राला समर्पित केले. दरवर्षी जांभोरा गावात तसेच पंचक्रोशीत नगरभोजन व महाप्रसादाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली. मात्र वडिलोपार्जित जमिनीतील शेतवाट १२ ऑक्टोबर २०२० पासून अडवल्यामुळे शेती करणे कठीण झाले असून रस्त्याअभावी संपूर्ण शेती कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत.

न्याय मिळावा यासाठी त्यांनी महसूल मंत्री, खासदार, मतदारसंघाचे आमदार, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत. तरीही अद्याप कार्यवाही न झाल्याने ७६ व्या वर्षी अन्नत्याग उपोषण करावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

हे पण वाचा..

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार 28 ते 30 जानेवारी राज्यात दुखवटा; शासकीय कार्यालयांना सूचना

न्यायप्रिय, शिस्तप्रिय आणि आयुष्यभर विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकाला न्यायासाठी उपोषण करावे लागते, ही बाब प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून संपूर्ण तालुक्यात या आंदोलनाची चर्चा सुरू आहे.

 

👉 ग्रामीण प्रश्न, प्रशासनिक अन्याय आणि जनआंदोलनाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

Related News:

हे धाडस नाही, ही मजबुरी आहे! बाप आजारी म्हणून ई-पीक नोंदीसाठी १४ वर्षांचा मुलगा रात्री शेतात
महिला सक्षमीकरणाची नवी नांदी! बचत गटांना साथ देणाऱ्या पुरुषांचा साखरखेर्ड्यात ‘सुधारक सन्मान’

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे पोलिसांची कारवाई

मेहकर तालुक्यात मोठी कारवाई; देऊळगाव साकर्शा येथे १ क्विंटल २६ किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन आस्थापनांवर कारवाई करत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.

शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

Leave a Comment