KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

सक्तीची कर्जवसुली थांबवा, स्मार्ट मीटर हटवा! मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनाला अल्टिमेटम

On: November 4, 2026 9:58 PM
Follow Us:
मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन

मोताळा : संदिप धुरंधर 

मोताळा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत असल्याचा आरोप असलेली सक्तीची कर्जवसुली, स्मार्ट मीटर आणि अवाढव्य वीजबिलांच्या प्रश्नांसह विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या मोताळा तालुका पदाधिकाऱ्यांनी माननीय तहसीलदार यांना सादर केले. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांत भाऊ वाघोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष समाधान भाई डोंगरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रशांत वाघोदे यांनी विविध जनहिताच्या मुद्द्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी मागील काही दिवसांत शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करण्यात आला. संबंधित विधानाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन नागरिकांच्या हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे नागरिकांना कठीण होत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला. फायनान्स कंपन्यांचे एजंट अतिरिक्त व्याज आणि घरावर जप्ती येण्यासारख्या बाबी सांगून महिलांना तसेच कर्जदारांना भयभीत करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला.

मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी सक्तीची कर्जवसुली करू नये, अशी भूमिका मांडलेली असतानाही काही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संबंधित कंपन्यांना समज देऊन महिलांसह कर्जदारांना दिलासा द्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

सक्तीने बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर आणि अवाढव्य वीजबिलांच्या प्रश्नावरही वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला. या मागणीसाठी मोर्चा महावितरण कार्यालयाकडे वळवण्यात आला. तेथे उपस्थित असलेले डाबरे साहेब यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

स्मार्ट मीटर सक्तीने का बसवण्यात आले, त्यासंदर्भातील आदेश किंवा पत्र देण्यात यावे, नॉनफॉल्टी मीटर का काढण्यात आले, चुकीची वीजबिले कमी करून द्यावीत आणि नॉनफॉल्टी मीटर ३० दिवसांच्या आत पुन्हा बसवण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयात बसवलेल्या स्मार्ट मीटरची होळी करण्यात येईल, असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीने दिला.

या निवेदनाला तळणी येथील युवा संघर्ष टीम या सामाजिक संघटनेने सहभागी होत जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव विशाल भाऊ मोरे, विलास भाऊ प्रधान, तालुका प्रसिद्धी प्रमुख सागर बोदडे, BSI तालुका अध्यक्ष संजय गुरचवले, पंजाबराव जाधव, सागर धुरंधर, WD वानखेडे सर, रोहन सावळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि युवा संघर्ष टीम तळणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोताळा तालुक्यातील शेतकरी, महिला, वीज ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मायक्रो फायनान्स कर्जवसुली, स्मार्ट मीटर आणि अवाढव्य वीजबिलांच्या मागण्यांवर संबंधित विभागाकडून काय कार्यवाही होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

📢 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा!

KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि महत्त्वाच्या स्थानिक बातम्या सर्वप्रथम जाणून घ्या.

📲 Join WhatsApp Group ✅

📰 KattaNews वाचकांसाठी आवाहन

मोताळ्यातील या प्रश्नांवर प्रशासन काय निर्णय घेणार? यासंबंधीचे पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी KattaNews.in सोबत जोडलेले राहा. ही बातमी आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्थानिक प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून द्या.

हेही वाचा

📌 इंस्टाग्रामवर प्रेम जुळले, १२ वर्षांचा संसार मोडला! चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन महिला ३० वर्षीय युवकासोबत निघून गेली

📌 चिखली तालुक्यातील अमोना येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या; २५ वर्षीय ऋतिकच्या मृत्यूने गाव हळहळले

📌 दहावी-बारावी परीक्षा शुल्क माफी: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा, शाळांना ७ दिवसांत अर्ज भरण्याचे निर्देश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आनंद परांजपे यांची महायुती आणि संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया

‘आमच्याकडेही मोठा शब्दकोश; पण दोस्तीत कुस्ती नको!’ आनंद परांजपेंचा भाजपला इशारा; संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर कारवाईचे संकेत

संजय गायकवाड आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील संभाव्य पक्षीय कारवाई

शेतकऱ्यांवरील वक्तव्य संजय गायकवाडांना भोवणार? एकनाथ शिंदे नाराज; निलंबनाच्या कारवाईची चर्चा

बुलढाणा धम्म मेळाव्यात भाषण करताना ॲड. बाळासाहेब आंबेडकर

‘मतदानाची इज्जत करायला शिका!’ बुलढाण्यातील धम्म मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेवर आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया

Sanjay Gaikwad On BJP: ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर 106 आमदार असूनही घरी बसला असता’; भाजपला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

मोताळा POCSO प्रकरण – अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात; अल्पवयीन मुलगी गर्भवती, १९ वर्षीय युवकावर POCSO अंतर्गत गुन्हा

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात 90.75 टक्के मतदान

शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत; बुलढाण्यात 90.75% मतदान, कोण मारणार बाजी?

Leave a comment