KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

इंस्टाग्रामवर प्रेम जुळले, १२ वर्षांचा संसार मोडला! चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन महिला ३० वर्षीय युवकासोबत निघून गेली

On: November 3, 2026 8:57 PM
Follow Us:
इंस्टाग्रामवर प्रेम जुळल्याने साखरखेर्डा येथील संसार मोडल्याची घटना

साखरखेर्डा : समाधान सरकटे 

सुखाने सुरू असलेला संसार एका इंस्टाग्राम अकाउंटमुळे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र साखरखेर्डा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री पाहायला मिळाले. बारा वर्षांचा संसार आणि दोन मुले असतानाही एका विवाहित महिलेने ३० वर्षीय युवकासोबत जाण्याचा हट्ट धरला. इंस्टाग्रामवर प्रेम जुळल्याचे सांगणाऱ्या या महिलेसमोर नातेवाईक आणि पोलीस हात जोडून समजावत राहिले, पण तिने निर्णय बदलला नाही. अखेर ती युवकासोबत निघून गेली आणि पोलीस ठाण्यात जमलेल्या कुटुंबीयांना खाली मान घालावी लागली.

२ नोव्हेंबरच्या रात्री पतीच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी या महिलेला एका गावातून ताब्यात घेतले. इंस्टाग्रामवर तिच्याशी संबंध जुळलेल्या युवकालाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही बातमी कळताच महिलेचे पती, काका, चुलत भाऊ आणि गावातील अनेक नातेवाईक ठाण्यात जमले. प्रत्येकजण आपापल्या परीने तिची समजूत काढत होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही बराच वेळ तिच्याशी संवाद साधला.

मात्र, माझे खरे प्रेम याच्यासोबत आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि मला पतीसोबत राहायचे नाही, अशी भूमिका तिने ठामपणे मांडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १२ वर्षांच्या संसारात तिला दोन मुले झाली. मोठा मुलगा दहा वर्षांचा, तर धाकटा चार ते पाच वर्षांचा आहे. याच काळात तिची लांबच्या नात्यातील ३० वर्षीय युवकाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. ही ओळख प्रेमसंबंधात बदलली आणि दोघांनी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. जाताना तिने चार वर्षांच्या मुलालाही सोबत घेतल्याची माहिती आहे.

दोघे एका गावात असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. मात्र, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी पोलिसांसमोरही मांडली. महिलेचे माहेर आणि युवकाचे गाव दोन्ही साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. पण हे प्रकरण मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने साखरखेर्डा पोलिसांनी महिलेला मेहकर पोलिसांच्या ताब्यात दिले. जाताना मी त्याच्यासोबतच त्याच्या वाहनात बसून येईन, असा आग्रहही तिने धरल्याचे समजते. अखेर दोघेही मेहकरला रवाना झाले.

काका, चुलत भाऊ आणि इतर नातेवाईकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण ते सगळे निष्फळ ठरले. आपल्या घरातील मुलगी, सून किंवा बहीण असा निर्णय घेते, तेव्हा आई-वडील, भाऊ-बहीण आणि संपूर्ण कुटुंबावर काय बितते, याचा अंदाज त्या रात्री ठाण्यातील चेहऱ्यांवरून येत होता. प्रेम आंधळे असते, असे म्हणतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव साखरखेर्डा परिसराने या घटनेतून घेतला.

या घटनेचा सर्वाधिक फटका त्या दोन चिमुकल्यांना बसणार आहे. दहा वर्षांचा मुलगा आता घरात काय घडले हे समजण्याइतका मोठा झाला आहे, तर चार वर्षांचा मुलगा आईच्या सोबत गेला आहे. आईचा निर्णय योग्य की अयोग्य हा वेगळा प्रश्न असला, तरी मुलांचे शिक्षण, सुरक्षितता आणि मानसिक आधार यांचा विचार कुटुंब आणि प्रशासन दोघांनीही गांभीर्याने करायला हवा, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.

आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे आणि इंस्टाग्राम, फेसबुकवर नव्या ओळखी होणे अगदी सामान्य झाले आहे. मात्र, इंस्टाग्रामवर प्रेम जुळून थेट संसार मोडण्यापर्यंत गोष्टी जातात, तेव्हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न राहत नाही, तर तो समाजाचा विषय बनतो. लग्नानंतरही पती-पत्नीमध्ये मोकळा संवाद असणे, एकमेकांना वेळ देणे आणि मनातील अडचणी वेळेत सांगणे, हे संसार टिकवण्यासाठी गरजेचे आहे. मोबाइलवर कोण कोणाशी बोलते, यावर संशय घेणे वेगळे आणि कुटुंबात विश्वासाचे वातावरण ठेवणे वेगळे, हे दोन्ही भान ठेवावे लागते.

साखरखेर्डा आणि मेहकर परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून, पुढे पोलीस तपासात काय समोर येते आणि महिलेचा पती आणि कुटुंबीय काय पावले उचलतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. याबाबतची अधिकृत माहिती मिळताच ती KattaNews.in वर सर्वप्रथम प्रसिद्ध केली जाईल.

बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या मोबाइलवर!

साखरखेर्डा, मेहकर, सिंदखेड राजासह संपूर्ण जिल्ह्यातील ताज्या घडामोडी थेट WhatsApp वर मिळवा.

🟢 Join WhatsApp Group ✅

तुम्हाला काय वाटते? मोबाइल आणि सोशल मीडियामुळे कुटुंबातील संवाद कमी होतोय का? तुमचे मत आमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की मांडा. ही बातमी तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा, कारण वेळेत संवाद साधला तर एखादा संसार वाचू शकतो.

संबंधित बातम्या

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नेवासा सोयाबीन चोरी प्रकरणात देऊळगाव राजा येथील तिघांना अटक

नेवासा सोयाबीन चोरीचा तपास थेट देऊळगाव राजात; पाच जणांची नावे समोर, तिघांना अटक, दोघे फरार

देऊळगाव राजा येथे तेलंगणा पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेतल्याची घटना

देऊळगाव राजात तहसील कार्यालयातून सराफाला नेले; अपहरणाची चर्चा, नाकाबंदीत तेलंगणा पोलिसांचा मोठा खुलासा!

अमोना येथील ऋतिक पेहरे यांच्या मृत्यूची बातमी

चिखली तालुक्यातील अमोना येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या; २५ वर्षीय ऋतिकच्या मृत्यूने गाव हळहळले

परीक्षा शुल्क माफीसाठी अर्ज भरणारे दहावी-बारावीचे विद्यार्थी

दहावी-बारावी परीक्षा शुल्क माफी: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा, शाळांना ७ दिवसांत अर्ज भरण्याचे निर्देश

शेतकरी मदतीच्या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर आंदोलनात सहभागी आमदार सिद्धार्थ खरात

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला!’ ५ हजारांच्या मदतीवरून सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर निशाणा

बुलढाणा न्यायालयाचा सोयाबीन व्यापारी धनादेश अनादर प्रकरणातील निकाल

शेतकऱ्याच्या सोयाबीनचे पैसे थकवणे व्यापाऱ्याला पडले महागात; बुलढाणा न्यायालयाने सुनावली ३ महिन्यांची शिक्षा!

Leave a comment