हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भरधाव स्विफ्ट डिझायरच्या धडकेत एक महिला ठार, आठ महिला गंभीर जखमी

On: February 3, 2026 7:23 AM
Follow Us:
लोणार तालुक्यात स्विफ्ट डिझायरने महिला मजुरांच्या ऑटोला धडक दिल्याने झालेला भीषण अपघात

लोणार | ३ फेब्रुवारी २०२६

तालुक्यातील किनगावजटू येथून मातमळकडे नेटसेटच्या कामासाठी जाणाऱ्या महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिल्याची भीषण घटना आज शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेताजवळील वळणावर घडली. या अपघातात एक महिला मजूर ठार तर अन्य आठ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

एमएच-२८-आर-२२११ क्रमांकाच्या ऑटो रिक्षातून चालक महिलामजुरांना घेऊन किनगावजटू येथून मातमळकडे जात होता. सरस्वती नदीजवळील वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एमएच-४३-एएफ-५८२१ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने ऑटोला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ऑटो पलटी झाला आणि त्यातील महिला मजूर रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या.

या अपघातात जरीनाबी अय्युबशहा (वय ४५, रा. किनगावजटू) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रंजना परमेश्वर कास्तोडे (५३), शांताबाई शेवाळे (४५), कल्पना विठ्ठल जमधाडे (४०), अलका मधुकर शेवाळे (४०), लक्ष्मण बबन करवते (४५), चंद्रभागा गजानन नागरे (४०), राधा गजानन गायकवाड तसेच ऑटो चालक आसिफ निंशालशहा (वय ३०) हे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्विफ्ट डिझायरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित कार ही हिवराखंड येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सर्व जखमींना लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.

📌 वाचकांसाठी सूचना

अशाच ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह ग्रामीण व जिल्हास्तरीय बातम्यांसाठी Kattanews.in ला वर फॉलो करा.

📰 संबंधित बातम्या

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment