हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जन्मदात्या पित्यापाठोपाठ राजकीय बापाचं छत्र हरवलं; अजित दादांच्या निधनाने मी कायमचा पोरका झालो – अॅड. नाझेर काझी

On: January 31, 2026 9:39 AM
Follow Us:
अजित पवार निधनानंतर भावुक प्रतिक्रिया देताना अॅड. नाझेर काझी

बुलढाणा | ३१ जानेवारी २०२६

नियतीने माझ्यावर पुन्हा एकदा कठोर घाव घातला आहे. मला जन्म देणाऱ्या पित्याचं छत्र नुकतंच हरपलं असतानाच, माझ्या राजकीय जीवनात बाप म्हणून ओळख असणाऱ्या उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालं. या दुहेरी आघाताने मी पूर्णतः उध्वस्त झालो असून आयुष्यभरासाठी पोरका झाल्याची तीव्र संवेदना मनात घर करून आहे, अशी हृदयद्रावक भावना अॅड. नाझेर काझी यांनी व्यक्त केली.२५ जानेवारी रोजी मध्यरात्री माझ्या जन्मदात्या वडिलांचं दुःखद निधन झालं. त्या दुःखाच्या डोंगराखाली दबलेलो असताना अजित दादांनी मला धीर दिला. २७ जानेवारी रोजी त्यांनी पाठवलेल्या पत्रात ‘ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही’ असं नमूद करत माझ्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्या शब्दांनी क्षणभर का होईना मला मानसिक आधार मिळाला होता.

मात्र धीर देणारा तो आधारवडच दादांच्या रूपाने अचानक निघून गेला. माझ्या राजकीय जीवनाचा कणा असलेले, मार्गदर्शक आणि बापासारखी माया करणारे दादा आज आपल्यात नाहीत, ही घटना अजूनही मनाला पटत नाही, असं सांगताना अॅड. काझी भावुक झाले.

अजित दादांच्या जाण्यामुळे मातृतीर्थ सिंदखेडराजाची अपरिमित हानी झाली आहे. दादा हे शब्दाचे पक्के होते. जे बोलले ते करून दाखवणं हेच त्यांचं राजकीय जीवन राहिलं आहे. सिंदखेडराजाच्या विकासासाठी आम्ही पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली होती.

दादा सात ते आठ तास प्रत्यक्ष सिंदखेडराजात उपस्थित राहत होते. त्यामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला होता, विकास आराखड्याला स्पष्ट दिशा मिळाली होती. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे केवळ सिंदखेडराजाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच ही न भरून निघणारी हानी असल्याचं अॅड. नाझेर काझी यांनी नमूद केलं.

👉 अशाच राजकीय, सामाजिक आणि थेट ग्राउंड रिपोर्टिंगसाठी Kattanews.in नियमित वाचा.

संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर पंचायत समिती माहिती अधिकार कारणे दाखवा नोटीस

माहिती अधिकाराच्या आदेशाची पायमल्ली? मेहकर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाची कारणे दाखवा नोटीस

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचे पथसंचलन

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; पथसंचलनातून दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

Leave a Comment