हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेड राजा–देऊळगाव राजा शहरांसाठी मोठी मागणी; आमदार मनोज कायंदेंनी विधानसभेत निधीसाठी आवाज उठवला.

On: December 17, 2025 3:43 PM
Follow Us:
सिंदखेड राजा व देऊळगाव राजा शहर विकासासाठी विधानसभेत निधीची मागणी करताना आमदार मनोज कायंदे

सिंदखेड राजा /प्रतिनिधी (कट्टा न्यूज)

सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या ऐतिहासिक शहरांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत नागरी सुविधांसाठी आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात बोलताना त्यांनी स्वच्छता, भूमिगत गटार योजना, दर्जेदार रस्ते आणि अपूर्ण विकासकामे यांसाठी शासनाने तातडीने भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

दोन्ही शहरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्यामानाने नागरी सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. विशेषतः अर्धवट अवस्थेतील भूमिगत गटार योजना आणि अपूर्ण पायाभूत सुविधा यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चालल्याचे आमदार कायंदे यांनी स्पष्ट केले.

शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना पुरेशा नसून अद्ययावत व दीर्घकालीन विकास आराखडा आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. शहरांतर्गत चांगल्या दर्जाचे रस्ते, आधुनिक गटार व्यवस्था, नागरिकांसाठी सुसज्ज क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक आणि सार्वजनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, मागील काही वर्षांपासून रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी ठाम मागणी आमदार मनोज कायंदे यांनी शासन दरबारी लावून धरली. सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा ही शहरे केवळ निवासासाठी नव्हे, तर नागरिकांना अभिमान वाटावा अशी आदर्श शहरे बनवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमदार कायंदे यांच्या या मागणीमुळे दोन्ही शहरांतील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, शासन यावर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या भागातील बातम्या सर्वप्रथम वाचा

अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक घडामोडींसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.

आता वाचा KattaNews.in

संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची सस्नेह भेट; शेतकरी प्रश्नांवर चर्चा

अंत्री खेडेकर येथे शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

शेतात पाणी काढताना बिबट्याचा शेतमजुरावर अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावरील पळसखेड चक्का येथे झालेला भीषण अपघात

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर भीषण अपघात; पुलावरून मोटरसायकल खाली कोसळली, चालकाचा जागीच मृत्यू

Leave a comment