हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

On: December 12, 2025 9:57 AM
Follow Us:
दुसरबीड–सिंदखेड राजा भीषण अपघातात सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली मृत्यू

सिंदखेडराजा/सचिन खंदारे 

दुसरबीड–सिंदखेड राजा  रोडवर भीषण अपघातानंतर  परिसर हादरला आहे. हा अपघात दुसरबीड–सिंदखेड राजा  रोडवर नागझरी नाल्याजवळ झाला असून या अपघातात सैन्यातील जवानांच्या २५ वर्षीय पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलगा व दुचाकी चालक मात्र चमत्कारिकरीत्या बचावले.

घटना १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रूक येथील भारतीय सैन्यात सेवेत असलेले प्रमोद सुरेश गवई (वय ३२) हे पत्नी कोमल गवई (वय २५) व लहान मुलासह एमएच-३०-बीके-४९९९ क्रमांकाच्या बुलेटने लोणार सासुरवाडीकडे निघाले होते. दरम्यान समोर चालणाऱ्या अज्ञात बैलगाडीला बुलेटचा किरकोळ धक्का लागला आणि दुचाकी अचानक थांबली.

अचानक झालेल्या धक्क्यामुळे पाठीमागे बसलेली कोमल गवई रस्त्यावर पडली आणि त्याच क्षणी समोरून येणाऱ्या एमएच २१ बीडब्ल्यू ३३४४ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या अंगावरून जात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेत पती व मुलगा सुखरूप वाचले.

हे‌ पण वाचा..

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार.

अपघाताची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा रुग्णालयात हलविण्यात आला.


📢 अपडेट्स चुकवू नका!

ब्रेकिंग न्यूज, स्थानिक अपडेट्स आणि Google वर दिसणाऱ्या टॉप स्टोरीजसाठी Kattanews.in फॉलो करा.

👉 Kattanews.in – ताज्या घडामोडी


📌 संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची सस्नेह भेट; शेतकरी प्रश्नांवर चर्चा

अंत्री खेडेकर येथे शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

शेतात पाणी काढताना बिबट्याचा शेतमजुरावर अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावरील पळसखेड चक्का येथे झालेला भीषण अपघात

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर भीषण अपघात; पुलावरून मोटरसायकल खाली कोसळली, चालकाचा जागीच मृत्यू

Leave a comment