हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अतिवृष्टी, कर्जाचा डोंगर आणि विवंचना; शिंदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

On: January 12, 2026 9:53 PM
Follow Us:
अतिवृष्टी व कर्जाच्या ओझ्यामुळे शिंदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा |१२ जानेवारी २०२६

अतिवृष्टी, वाढते कर्ज आणि शेती पिकांचे मोठे नुकसान या आर्थिक विवंचनेतून शिंदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची हृदयद्रावक घटना आज १२ जानेवारी रोजी उघडकीस आली. शिंदी शेतकरी आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अतिवृष्टी शेतकरी आत्महत्या ही समस्या पुन्हा एकदा समोर आली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी अधोरेखित झाल्या आहेत.

शिंदी गावातील मृत शेतकऱ्याचे नाव सुनील उत्तमराव खरात (वय ४५) असे आहे. त्यांनी स्वतःच्या घरातच गळफास लावून जीवन संपवले. सुनील खरात यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती असून ती आईच्या नावावर होती. शेतीवर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज होते.आईच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सुनील खरात यांच्यावर आली.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मुग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने उत्पन्न बंद झाले, मात्र कर्जाचे व्याज मात्र वाढतच गेले.दोन मुलांचा शिक्षणखर्च, घरखर्च आणि वाढते कर्ज यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. या मानसिक तणावातूनच त्यांनी १२ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १:३० वाजताच्या सुमारास आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे बीट जमादार नितीन राजे जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात सुनील खरात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतकाच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून या घटनेमुळे शिंदी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

📢 शेतकरी हितासाठी आवाज उठा

अशा गंभीर सामाजिक प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा.

👉 बातमी पाठवा | Katta News


📰 हे पण वाचा..

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment