हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजात संभाजी ब्रिगेडला नवे बळ! विजय देशमुख यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

Follow Us:
सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्षपदी विजय देशमुख यांची नियुक्ती सोहळा

सिंदखेडराजा | दिनांक : 11 जानेवारी 2026

Sindkhed Raja Sambhaji Brigade News अंतर्गत जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणीला मोठे बळ मिळाले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या सिंदखेड राजा तालुकाध्यक्षपदी विजय देशमुख यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे तालुक्यात संभाजी ब्रिगेड अधिक ताकतीने उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.ही नियुक्ती जिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष मनोजदादा आखरे, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष विजयकुमार घोगरे,
ज्येष्ठ मार्गदर्शक नवनाथजी घाडगे, अर्जुन तनपुरे सर,
संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या हस्ते विजय देशमुख यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी सिंदखेड राजा तालुक्यात गावोगावी जाऊन संभाजी ब्रिगेडमध्ये तरुणांची मोठी फळी जोडण्याचा संकल्प करण्यात आला.या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली.
सिंदखेडराजा तालुक्यातील दैनिक सांजशक्तीचे जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप नाईकवाड
यांची मराठा सेवा संघ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
यामुळे संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाला भक्कम प्रसारमाध्यमीय पाठबळ मिळाले आहे.जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांचे अभिनंदन करताना,
संपूर्ण तालुक्यात संभाजी ब्रिगेड ताकदीने उभारण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
तसेच या कार्यासाठी माझ्यासह संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ सृष्टीचे सर्व वरिष्ठ कार्यकर्ते
आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.हे पण वाचा..

चिखली-खामगाव रोडवर कार उलटली, १७ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू.

विजय देशमुख यांच्या नियुक्तीबाबत सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात येत असून,
त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


📢 वाचकांसाठी आवाहन

अशाच सिंदखेडराजा राजकीय बातम्या, संभाजी ब्रिगेड अपडेट्स
आणि बुलढाणा जिल्हा ताज्या घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी
Kattanews.in ला नियमित भेट द्या.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

🔗 Related News

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

Leave a Comment