हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

डोणगाव येथे भीषण अपघात! मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर चिखलीतील युवकाचा जागीच मृत्यू

On: January 11, 2026 6:48 PM
Follow Us:
डोणगाव येथे मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर झालेला भीषण अपघात

चिखली | शुक्रवार, ११ जानेवारी २०२६

डोणगाव येथे भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातात चिखलीतील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा अपघात डोणगाव पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.या भीषण अपघातात सतीश बाबराव निकाळजे (रा. राऊतवाडी, चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला. ते दुचाकीने प्रवास करत असताना मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की मृतकाचा चेहरा पूर्णतः विद्रूप झाला होता.प्राप्त माहितीनुसार मृतकाच्या वाहनाचा क्रमांक एम.एच. २६ ए.डी. २५८६ असा आहे. अपघातानंतर घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कॉन्स्टेबल हर्ष सहगल, पवन गावणे व गोविंदा खंडागळे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.हे पण वाचा..

चिखली-खामगाव रोडवर कार उलटली, १७ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, महामार्गावरील वाढते अपघात नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत.


📌 महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in सोबत रहा

बुलढाणा, चिखली, मेहकर, डोणगाव व परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.


 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment