हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय 15 ऑगस्टपूर्वी सुरू होणार? प्रशासनाचे तातडीचे आदेश

On: July 8, 2026 8:05 AM
Follow Us:
साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर

साखरखेर्डा, प्रतिनिधी | समाधान सरकटे

साखरखेर्डा आणि परिसरातील हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी मोठी घडामोड समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय 15 ऑगस्टपूर्वी सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी रविवारी प्रत्यक्ष रुग्णालयाची पाहणी करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागाला दिले.

पाहणीदरम्यान रुग्णालयाच्या इमारतीतील काही कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या. या सर्व त्रुटी त्वरित दूर करून कोणतीही दिरंगाई न करता रुग्णालय कार्यान्वित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 15 ऑगस्टपूर्वी नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने कामाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

साखरखेर्डा परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची सातत्याने मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत 2014 मध्ये आमदार झाल्यानंतर डॉ. शशिकांत खेडेकर यांनी हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली.

रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून सुमारे 14 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी आणखी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि ते कामही पूर्ण झाले.

रुग्णालय सुरू करण्यासाठी अग्निसुरक्षा व्यवस्था अत्यावश्यक असल्याने फायर फायटिंग प्रणालीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षाविषयक महत्त्वाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.

केवळ इमारत उभारून उपयोग नसून प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणेही तितकेच आवश्यक असल्याने डॉ. खेडेकर यांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या 26 पदांच्या भरतीला नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे.

आज झालेल्या पाहणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या. उपविभागीय अभियंता सचिन वाघ, कनिष्ठ अभियंता संतोष आढाव आणि कनिष्ठ अभियंता अनिल बढे यांनी येत्या 15 दिवसांत उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

या पाहणीनंतर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्षात सुरू होण्याच्या मार्गावर आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख (शिंदे) बाबूराव मोरे, शिवसेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर, साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर शुक्ल, दिलीप सोभागे, विठ्ठल गायकवाड, संदीप खिल्लारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

काट्टा न्यूज वर अशाच विश्वासार्ह, जलद आणि स्थानिक बातम्यांसाठी आमचे संकेतस्थळ नियमित वाचा तसेच ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.


Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

Leave a Comment