सिंदखेडराजा | २४ जानेवारी २०२६
सिंदखेडराजा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये शासकीय शौचालय नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर नागरी समस्येवर AIMIM पक्षाने आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे शासकीय शौचालय उभारण्याची ठोस मागणी केली आहे. प्रभाग ६ शौचालय प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून यामुळे महिला, वृद्ध व प्रवाशांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये सार्वजनिक शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खुले शौच किंवा दूरवर जावे लागते. ही बाब आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर एम आय एम पक्षाचे माजी युवा तालुका अध्यक्ष सय्यद इरफान अली यांनी नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने शासकीय शौचालय उभारण्याची मागणी केली.
नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, प्रभाग क्रमांक ६ मध्ये शासकीय शौचालय उभारण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. तसेच शौचालयासाठी योग्य जागा निश्चित करून बांधकाम करण्यात येईल.
AIMIM पक्षाच्या वतीने नागरिकांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या असून, या प्रश्नावर लवकरच ठोस कार्यवाही होईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले आहे.
हे पण वाचा..
सिंदखेडराजा पंचायत समितीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; कर्मचारी कार्यालयाऐवजी बाहेरच अधिक दिसतात!
यावेळी निवेदन सादर करताना AIMIM चे माजी युवा तालुका अध्यक्ष इरफान अली, माजी तालुका सचिव सय्यद सादीक, प्रभाग अध्यक्ष समीर शहा तसेच शहर उपाध्यक्ष सय्यद नासेर उपस्थित होते.
👉 आपल्या परिसरातील नागरी समस्या, भ्रष्टाचार किंवा अन्य बातम्या Kattanews.in पर्यंत पोहोचवा.
WhatsApp / Call: 9561475736
संबंधित बातम्या
- गोरेगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी आमरण उपोषणाची सांगता; गटविकास अधिकाऱ्यांचे ठोस आश्वासन
- ब्रेकिंग | पुतण्याचा निर्घृण खून करून फरार काका काही तासांत जेरबंद; चिखली D.B. पथकाची धडक कारवाई
- मुख्यमंत्र्यांकडे निवेदन! सिंदखेडराजा विकास आराखड्यात वीररत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी












