KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग | पुतण्याचा निर्घृण खून करून फरार काका काही तासांत जेरबंद; चिखली D.B. पथकाची धडक कारवाई

On: January 23, 2026 8:24 AM
Follow Us:
चिखली येथे पुतण्याचा खून करून फरार काकाला D.B. पथकाने अटक केली

चिखली (बुलढाणा) | २३ जानेवारी २०२६

चिखली तालुक्यातील हातणी गावात घरगुती वादातून पुतण्याचा निर्घृण खून करून फरार झालेल्या काकाला चिखली पोलीस स्टेशनच्या D.B. पथकाने अवघ्या काही तासांत अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी रामचंद्र मारोती जाधव (रा. हातणी) यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली. दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरात जेवण सुरू असताना त्यांचा मुलगा विनोद जाधव आणि सून सौ. मिरा यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला.वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी नातू गोपाल अजाबराव जाधव हा घरात आला.
नेहमीच्या भांडणामुळे समाजात बदनामी होत असल्याचे सांगत त्याने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या वादाचा राग मनात धरून विनोद उर्फ रामचंद्र जाधव याने गोपालवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला, ज्यात गोपालचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. 60/26 नुसार कलम 103(1), 352 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउपनि भागवतकर यांच्याकडे देण्यात आला.
घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या सूचनेनुसार D.B. पथकाने हातणी शिवारातील संपूर्ण परिसर पिंजून काढत आजूबाजूच्या शेतांची तपासणी केली.

 

दरम्यान आरोपी मंकया शेतामध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच D.B. पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

हे पण वाचा..

सिंदखेडराजा पंचायत समितीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; कर्मचारी कार्यालयाऐवजी बाहेरच अधिक दिसतात!

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून चिखली पोलीस स्टेशन व D.B. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


ताज्या गुन्हेगारी बातम्यांसाठी Kattanews.in ला रोज भेट द्या व बातमी शेअर करा.


 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा पोलीस आणि तेलंगणा LCB प्रकरण

मामाच्या तक्रारीवरून अपहरणाची नोंद करण्याची देऊळगाव राजा पोलिसांना घाई का? तेलंगणा LCB प्रकरणात सवाल

जुने मंडपगाव शिवारात अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले नऊ टिप्पर

देऊळगाव राजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल-पोलिसांची धडक कारवाई; एकाच वेळी ९ टिप्पर जप्त

इंस्टाग्रामवर प्रेम जुळल्याने साखरखेर्डा येथील संसार मोडल्याची घटना

इंस्टाग्रामवर प्रेम जुळले, १२ वर्षांचा संसार मोडला! चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन महिला ३० वर्षीय युवकासोबत निघून गेली

नेवासा सोयाबीन चोरी प्रकरणात देऊळगाव राजा येथील तिघांना अटक

नेवासा सोयाबीन चोरीचा तपास थेट देऊळगाव राजात; पाच जणांची नावे समोर, तिघांना अटक, दोघे फरार

देऊळगाव राजा येथे तेलंगणा पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेतल्याची घटना

देऊळगाव राजात तहसील कार्यालयातून सराफाला नेले; अपहरणाची चर्चा, नाकाबंदीत तेलंगणा पोलिसांचा मोठा खुलासा!

अमोना येथील ऋतिक पेहरे यांच्या मृत्यूची बातमी

चिखली तालुक्यातील अमोना येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या; २५ वर्षीय ऋतिकच्या मृत्यूने गाव हळहळले

Leave a comment