हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मुख्यमंत्र्यांकडे निवेदन! सिंदखेडराजा विकास आराखड्यात वीररत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी

Follow Us:

सिंदखेडराजा|२३ जानेवारी २०२६

सिंदखेडराजा विकास आराखड्यांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक वीररत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, अशी ठाम मागणी नाभिक समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. १९ जानेवारी रोजी हे निवेदन बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वीररत्न जिवाजी महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. “लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे” हे त्यांचे ऐतिहासिक उद्गार आजही स्वराज्याच्या निष्ठेचे प्रतीक आहेत.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सिंदखेडराजा ही राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जन्मभूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ म्हणून ओळखली जाते. याच पवित्र भूमीत सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. अशा ऐतिहासिक शहरात वीररत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे हे इतिहासाला न्याय देणारे ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सिंदखेडराजा विकास आराखड्यांतर्गत नाव्हा रोड – देऊळगावराजा रोड परिसरात हा पुतळा उभारावा, अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

हे पण वाचा..

सिंदखेडराजा पंचायत समितीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; कर्मचारी कार्यालयाऐवजी बाहेरच अधिक दिसतात!

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष हरिदास जाधव, जिल्हा मुख्य सचिव डॉ. प्रकाश सवडतकर, तालुकाध्यक्ष विलास चित्रे, शहराध्यक्ष प्रदीप जाधव, तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव, विजय बाबडे, शिवानंद वैद्य, गजानन राऊत, विष्णू वैद्य, राम राऊत, रामेश्वर जाधव यांच्यासह समस्त नाभिक समाजाच्या स्वाक्षऱ्या आहेत.


📌 वाचकांसाठी आवाहन

ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना योग्य सन्मान मिळावा, यासाठी आपल्या मताचा आवाज बुलंद करा. ही बातमी शेअर करा.


📰 संबंधित बातम्या

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

Leave a Comment