KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

मेहकर-चिखली मार्गावर साखरखेर्डा पोलिसांची मोठी कारवाई! वाळू वाहतूक करणारी ३ वाहने जप्त; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

On: November 27, 2026 10:58 PM
Follow Us:
साखरखेर्डा पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी जप्त केलेली तीन वाहने

साखरखेर्डा | समाधान सरकटे 

KattaNews जाहिरात 1

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात साखरखेर्डा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मेहकर-चिखली मार्गावर तसेच लव्हाळा फाट्यावर केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी वाळूची वाहतूक करणारी तीन वाहने पकडली. या वाहनांमधून एकूण १४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून वाहनांसह जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४९ लाख ५६ हजार रुपये आहे.

KattaNews जाहिरात 2

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक रात्री मेहकर-चिखली मार्गावर गस्त घालत होते. यावेळी आचल वाईन शॉपसमोर रात्री सुमारे १० वाजता चिखलीकडून मेहकरच्या दिशेने जाणारा टाटा कंपनीचा २८३२ मॉडेलचा दहा चाकी हायवा (क्रमांक एमएच २८ सीएफ ८९५२) पोलिसांना आढळून आला.

KattaNews जाहिरात 3

पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गौण खनिज वाळू असल्याचे समोर आले. चालक बळीराम प्रकाश मुंढे (रा. नारायणखेड, ता. देऊळगाव राजा) याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर सहाय्यक फौजदार कडूबा डोईफोडे यांनी आचल वाईन शॉपच्या प्रकाशात पंचनामा केला. यावेळी वाहनाच्या मागील हौद्यात सहा ब्रास वाळू आढळून आली.

KattaNews जाहिरात 4

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण इनामे यांच्या फिर्यादीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित ट्रकची अंदाजे किंमत २५ लाख रुपये, तर वाळूची किंमत २४ हजार रुपये असून एकूण २५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी बळीराम प्रकाश मुंढे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच मार्गावर यापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलिसांनी आणखी एक कारवाई केली होती. पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण इनामे, कडूबा डोईफोडे, गजानन वाघ आणि राजेश गिते हे पेट्रोलिंग करीत असताना लव्हाळा फाट्यावर दोन ट्रक संशयास्पदरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आले.

या दोन्ही ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी चार ब्रास वाळू आढळून आली. नदीपात्रातून गौण खनिजाचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामध्ये एमएच १६ सीडी ७६३५ क्रमांकाच्या सहा टायर ट्रकचा चालक सौरभ दत्तात्रय म्हस्के (वय २३, रा. खैरव, ता. सिंदखेड राजा) आणि एमएच १४ एमटी ४९३३ क्रमांकाच्या टाटा ट्रकचा चालक दीपक जनार्दन टाले (वय २४, रा. खैरव, ता. सिंदखेड राजा) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या दोन्ही वाहनांची किंमत २४ लाख रुपये, तर त्यातील आठ ब्रास वाळूची किंमत ३२ हजार रुपये असल्याने एकूण २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण इनामे यांच्या फिर्यादीवरून सौरभ म्हस्के आणि दीपक टाले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये साखरखेर्डा पोलिसांनी एकूण तीन वाहने आणि १४ ब्रास वाळू जप्त केली आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधातील या कारवाईमुळे परिसरातील वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कडूबा डोईफोडे करीत आहेत.

फोटो : साखरखेर्डा पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेली वाळू वाहतुकीची वाहने.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी मिळवा!

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी Katta News च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

✅ WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

इतर महत्त्वाच्या बातम्या

बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 https://kattanews.in/

Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखली रुग्णालयात बिलावरून झालेला वाद आणि डॉक्टरांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचे प्रतिनिधिक दृश्य.

चिखलीत रुग्णालयात एक हजार रुपयांवरून वाद! डॉक्टर सुहास खेडेकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा; महिलेच्या विनयभंगाचा आरोप

डोणगाव परिसरात आशीर्वादाच्या बहाण्याने १० हजार १०० रुपये लंपास केल्याची घटना

भगवी पगडी, अंगाला भस्म अन् आशीर्वादाचा बहाणा! संभाजीनगरचा रस्ता विचारला, शुद्धीवर येताच खिशातील १०,१०० रुपये गायब!

प्रतापराव जाधव आणि सुबोध सावजी यांची वाढदिवसानिमित्त गळाभेट

बुलढाण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! प्रतापराव जाधव-सुबोध सावजींची गळाभेट; ‘दोन मल्ल एकत्र आले’ या विधानाची चर्चा

डोणगाव-जानेफळ मार्गावरील नवीन सिमेंट रस्त्यावर एसटी बससेवेची प्रतीक्षा

रस्ता झाला चकाचक, तरी ‘लालपरी’ गायब! डोणगाव-जानेफळ मार्गावर एसटी बस सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

साखरखेर्डा परिसरातील शिंदी येथे शेतातील केबल चोरी

साखरखेर्डा परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ! शिंदीतील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून केबल लंपास

मेहकर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग आणि रेशन कार्ड प्रकरण

मेहकर तहसीलच्या पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट! रेशन कार्डच्या नावाखाली नागरिकांची लूट; CCTV तपासण्याची मागणी

Leave a comment