मानोरा (वाशिम) : १६ मार्च २०२६
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025 साठी “मेरी पॉलिसी मेरे हाथ” या उपक्रमाचे मानोरा तालुक्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात येत असून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहत आहेत.
या कार्यक्रमांतर्गत शेतकरी सभांचे आयोजन करून शेतकऱ्यांना पिक विम्याचे महत्त्व, विमा प्रक्रियेची माहिती आणि योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी योगेश आरू यांनी ‘फसल बीमा पाठशाला’ घेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच QR चॅटबॉट कोड, कृषी रक्षक पोर्टल याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
यासोबतच दुधाळ जनावरांचे विमा संरक्षण याबाबतही माहिती देण्यात आली. ‘संपूर्ण पशुधन कवच’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या दुधाळ जनावरांचे विमा संरक्षण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना विमा योजनांची माहिती थेट मिळत असून पिक विमा आणि पशुधन विमा याबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यात पाहायला मिळत आहे.
📢 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
दररोजच्या ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती अपडेट, जॉब अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.
Related News
- Maharashtra Weather Alert : 17 ते 20 मार्च राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांचा इशारा
- Epstein Files प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; “ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी धोकादायक”
- राज्यात पिक विमा योजनेत मोठा बदल; शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे















