हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणारमध्ये कंत्राटदारांची मोठी फसवणूक उघड; बनावट शिक्क्यांद्वारे लाखोंचा घोटाळा, 5 आरोपी अटकेत

On: March 16, 2026 7:53 AM
Follow Us:
Lonar contractor fraud case accused arrested buldhana crime news

लोणार (बुलढाणा) | १६ मार्च २०२६ : शासकीय कंत्राटदारांची फसवणूक करून बनावट शिक्के आणि खोट्या सह्यांद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार लोणार येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणार पंचायत समिती अंतर्गत शासकीय कंत्राटदार म्हणून कार्यरत असलेल्या सौ. गायत्री तुषार ईवरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आरोपींनी बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्या करून शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे व पोलीस शिपाई दीपक पाटील यांनी आरोपींना अटक केली. या प्रकरणात आरोपी शेख मोहसीन शेख जाकीर, महेंद्र सिद्धार्थ भालेराव, सुरेश ज्ञानबा नागरे, संतोष प्रकाश गायकवाड आणि ओम सुधाकर खोडके यांना ताब्यात घेण्यात आले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


📢 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

दररोजच्या ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.

👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

📲 येथे क्लिक करा


Related News

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेवर रविकांत तुपकरांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

कर्जमाफीच्या यादीत तफावत? रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा; भूमिका स्पष्ट न केल्यास राज्यव्यापी आंदोलन

साखरखेर्डा क्रीडांगणासाठी सरकारी जमीन राखीव ठेवण्याची मागणी करताना ग्रामस्थ

भावी पिढ्यांच्या खेळाच्या हक्कासाठी साखरखेर्डा ग्रामस्थांचा एल्गार; १.६२ हेक्टर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची मागणी

मुलांच्या आरोग्याशी तडजोड नाही! महाराष्ट्रातील शाळांमध्ये जंक फूडवर निर्बंध; FDA चे नवे अन्न सुरक्षा नियम लागू

मुलांच्या आरोग्याशी तडजोड नाही! शाळांमध्ये जंक फूडवर निर्बंध; महाराष्ट्रात FDA चे नवे नियम लागू

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन आस्थापनांवर कारवाई करत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.

शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे – लोणार सरोवर, शेगाव, सिंदखेड राजा आणि आनंद सागर

बुलढाणा जिल्ह्यातील 25 प्रसिद्ध पर्यटन स्थळे; इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा संगम

सिंदखेडराजा येथील वैष्णव गडावर आषाढी एकादशीला हजारो वारकऱ्यांची पैदल वारी

आषाढी एकादशीला वैष्णव गडावर भक्तीचा महासागर! हजारो वारकऱ्यांची पैदल वारी, ३५ क्विंटल फराळ आणि ५०० सेवाधाऱ्यांची सेवा

Leave a Comment