हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखली तालुक्यात धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग; शेतकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला 30 एकर पिकाचा पट्टा

On: March 10, 2026 7:42 AM
Follow Us:
Short circuit causes wheat crop fire in Mera Budruk village Chikhli farmers controlling the fire

चिखली | १० मार्च २०२६

तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या पिकाला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी (९ मार्च) सकाळी घडली. शेतकऱ्यांनी समयसूचकता दाखवत धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून सुमारे २५ ते ३० एकर गव्हाचा पट्टा वाचला. मात्र काही पिकाचे नुकसान झाले आहे.

मेरा बुद्रुक येथील पिंपळगाव सोनारा रोडजवळील गोटी शिवार भागात मदन पडघान यांच्या शेतात किशोर पडघान यांनी सुमारे चार एकर गहू पेरला होता. शेतामधील बेहड्याच्या झाडाजवळून गेलेल्या विद्युत तारेचा झाडाच्या फांद्यांशी घर्षण होऊन अचानक शॉर्टसर्किट झाले. यामुळे उडालेल्या ठिणग्या गव्हाच्या पिकावर पडल्याने आग लागली.

ही घटना शेजारी असलेल्या प्रवीण पडघान, हर्षल पडघान, जय पडघान आणि कल्पना पडघान यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत इतर शेतकऱ्यांना बोलावले. आसपासच्या शेतातील शेतकरी घटनास्थळी धावून आले आणि झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.

दरम्यान काही शेतकऱ्यांनी विहिरीवरील मोटर सुरू करून पाण्याच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली.

या आगीत सुमारे १० ते १५ गुंठे गव्हाचे पीक जळून नुकसान झाले. विशेष म्हणजे या शेताच्या चारही बाजूंना सुमारे २५ ते ३० एकर गव्हाचा सलग पट्टा होता. वेळेत आग विझवली नसती तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.

दरम्यान, महावितरण कंपनीने विद्युत तारेजवळील झाडांच्या फांद्या वेळेत छाटल्या असत्या तर ही घटना टळली असती, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्युत लाईनची नियमित देखभाल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


📢 Related News


👉 अधिक स्थानिक व ब्रेकिंग बातम्यांसाठी

Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि आपल्या परिसरातील सर्वात विश्वासार्ह बातम्या सर्वप्रथम वाचा.

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

Leave a Comment