हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पाण्यासाठी प्राण दिलेल्या कैलास नागरे यांच्या पत्नीला पोलीस पाटील करा; आमदार सिद्धार्थ खरातांचा सरकारला इशारा

On: March 16, 2026 10:32 AM
Follow Us:
पाण्यासाठी बलिदान देणारे कैलास नागरे प्रकरण; आमदार सिद्धार्थ खरात यांची नागरे कुटुंबाला भेट

सिंदखेड राजा | १६ मार्च २०२६ 

शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण करून अखेर बलिदान देणारे शिवनी आरमाळ येथील कैलास नागरे यांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी शिवनी आरमाळ येथे जाऊन नागरे कुटुंबाची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी नागरे कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले असल्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात अजूनपर्यंत कोणताही ठोस लाभ या कुटुंबाला मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त करत आमदार खरात यांनी शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील आणि उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत पोलीस पाटील म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली.

कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून परिसरातील १४ गावांना पाणी मिळावे तसेच वाया जाणारे पाणी धरणात सोडण्यात यावे या मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. मात्र त्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने त्यांनी पाण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. या घटनेला एक वर्ष उलटूनही त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून अपेक्षित मदत मिळालेली नाही.

नागरे यांच्या घरी भेटीदरम्यान स्वाती नागरे यांनी आपल्या अडचणी आणि समस्या आमदार खरात यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर आमदार खरात यांनी प्रशासनाकडे नागरे कुटुंबाला तात्काळ मदत देण्याची मागणी करत त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याचीही मागणी केली.

जर शासनाने नागरे कुटुंबाला शासकीय नोकरी दिली नाही आणि तात्काळ मदत जाहीर केली नाही, तर या प्रकरणी आपण विधानमंडळात लक्षवेधी मांडणार असल्याचा इशाराही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला.

यापूर्वीही कैलास नागरे यांच्या बलिदानानंतर विधानभवनात हा प्रश्न सर्वप्रथम आमदार खरात यांनीच उपस्थित केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते नागरे कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती.

यावेळी शिवसेनेचे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष आत्माराम शेळके, मेहकर तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव, बद्री बोडके, सिद्धेश्वर आंधळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


📢 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

दररोजच्या ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि सरकारी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.

👉 येथे क्लिक करा


Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास क्रीडांगणाच्या जमिनीवर जमलेले युवक

साखरखेर्ड्यात सरकारी ई-क्लास जमिनीवर डल्ला? क्रीडांगण नांगरून ताबा घेण्याचा प्रयत्न; युवक संतप्त

शिंदी गावात 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

शिंदीत 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने, गावावर शोककळा

Leave a Comment