हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखली हादरली! मध्यवर्ती जयस्तंभ चौकात भीषण आग; काही मिनिटांत 6 दुकाने जळून खाक

On: March 15, 2026 5:30 PM
Follow Us:
massive fire at jaystambh chowk chikhli buldhana shops burnt in market area

चिखली |१५ मार्च २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील मध्यवर्ती जयस्तंभ चौक परिसरात अचानक भीषण आग लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण करत परिसरातील तब्बल पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयस्तंभ चौक परिसरातील भेळ सेंटर, बागवान यांचे फळांचे दुकान, घड्याळाचे दुकान तसेच काही इतर लहान व्यावसायिकांची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गोपाल देव्हडे यांनी स्वतः अग्निशमन दलाची वॉटर गन हातात घेत आग विझवण्यासाठी मदत केली. त्यांच्या या धाडसी कृतीचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

या भीषण आगीची माहिती मिळताच परिसरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र दुकाने जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा..

Maharashtra Weather Alert : 17 ते 20 मार्च राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांचा इशारा

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी कुणाल बोन्द्रे, काशिनाथ बोन्द्रे, सुरेंद्र ठाकूर आणि सुहास शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा..

बुलढाण्यात धक्कादायक सायबर गुन्हा! मोबाईल हॅक करून महिलेला Video Call वर विवस्त्र केलं; शारीरिक संबंधांची मागणी

विशेष म्हणजे घटनास्थळापासून अवघ्या सुमारे 200 मीटर अंतरावर पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे.


📢 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि ताज्या बातम्या मिळवा.

👉 क्लिक करा

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

Leave a Comment