हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

On: August 8, 2026 7:13 AM
Follow Us:
लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

लोणार |विनायक कुटे 

लोणार नगरपरिषद हद्दीतील रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये पारदर्शकता राखावी तसेच लाभार्थ्यांना मिळालेल्या अनुदानाची संपूर्ण माहिती नागरिकांसमोर यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत १५ दिवसांच्या आत माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बछिरे यांनी दिला आहे.

शिवसेना (उ.बा.ठा.)च्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात सन २०२१ ते २०२५ या कालावधीत रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची सविस्तर व साक्षांकित माहिती मागविण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याचे नाव, स्थळ निरीक्षण अहवाल, संबंधित छायाचित्रे, लाभार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे तसेच आजपर्यंत वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचा तपशील, धनादेशाच्या तारखांसह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

घरकुल योजनांमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी आणि पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती लपवून ठेवण्याऐवजी ती सर्वांसमोर येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नगरपरिषद प्रशासनाने हे सर्व दस्तऐवज येत्या १५ दिवसांच्या आत साक्षांकित करून उपलब्ध करून द्यावेत, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत माहिती न दिल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोणार नगरपरिषदेच्या प्रांगणात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय, आंदोलनादरम्यान नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देऊन कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करू दिला जाणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नगरपरिषद प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

या निवेदनावर जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी आंभोरे, इक्बाल कुरेशी, अश्पाक खान, योगेश भूक्कन, गोपाल मापारी, शेख सादेक शेख जमीर, शेख इक्बाल, ओवेस कुरेशी, ज्ञानेश्वर दुधामोगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


📲 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्वात आधी स्थानिक व महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी मिळवा.👉 WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment