हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जलजीवन मिशनचा फज्जा! काम पूर्ण दाखवलं, पण कंडारी गाव अजूनही पाण्याविना; 20 मेपासून आमरण उपोषण

On: May 21, 2026 9:34 AM
Follow Us:
कंडारी गावातील पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

सिंदखेडराजा |समाधान सरकटे 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात गावात अजूनही नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा 20 मेपासून मारोती मंदिराजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात गावातील नागरिकांच्या नळांना आजपर्यंत नियमित पाणी मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे.यापूर्वीही ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या. निवेदने देण्यात आली, अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या; मात्र प्रत्येक वेळी फक्त आश्वासने देऊन वेळ मारून नेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून कंडारी गावात तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास 20 मे 2026 पासून गावातील मारोती मंदिराजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर शिवाजी खरात, विद्याधर घुगे, संतोष जायभाये, स्वप्नील कायंदे, प्रद्युम्न कायंदे, रमेश कायंदे, मदन कायंदे, आत्माराम घुगे, आशोक नागरे, अरुण कायंदे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


📢 Kattanews.in आपल्या परिसरातील प्रश्नांना आवाज देत आहे. तुमच्या गावातील समस्या, आंदोलन, पाणीटंचाई किंवा प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.


👉 संबंधित बातम्या :

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हिवरा आश्रम येथे दिवसाढवळ्या घरफोडीत ६५ हजारांचा मुद्देमाल चोरीला; तपासासाठी घटनास्थळी पोलीस, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ

हिवरा आश्रमात चोरट्यांचा धुमाकूळ! १२ दिवसांत तिसरी चोरी; दिवसाढवळ्या घरफोडीत ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार स्वीकारताना आंबेवाडीच्या सुनिता भानुदास आव्हाड

गुलाब शेतीत घडवली यशोगाथा! आंबेवाडीच्या सुनिता आव्हाड यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार

कर्तव्यावर निघालेल्या बुलढाणा आगारातील एसटी चालक रमेश उबरहंडे यांचा बोलेरोच्या धडकेत मृत्यू

कर्तव्यावर निघालेल्या एसटी बसचालकाचा भीषण अपघातात मृत्यू; भरधाव बोलेरोची जोरदार धडक

लोणार येथे शाहीर कृष्णकांत जोशी बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत जनाबाई महिला मंडळातील महिला लोककलावंतांचा शाल, प्रशस्तीपत्र आणि वडाच्या रोपांचे वाटप करून सन्मान करण्यात आला.

लोणारमध्ये महिला लोककलावंतांचा गौरव; शाहीर कृष्णकांत जोशी संस्थेकडून शाल, प्रशस्तीपत्र आणि वडाच्या रोपांचे वाटप

मलकापूरमध्ये SBI एटीएममध्ये ग्रामसेविकेचे एटीएम कार्ड बदलून ७० हजार रुपये काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ग्रामसेविकेला एटीएममध्ये ७० हजारांचा गंडा; कार्ड बदलून अज्ञातांनी खाते केले रिकामे, गुन्हा दाखल

दिवठाणा येथील चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी; पालकांनी गावातच शाळा भरवून केलेले अनोखे आंदोलन

रस्ताच नाही, मग गावातच भरली शाळा! दिवठाण्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांचे अनोखे आंदोलन

Leave a Comment