हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत पोलिसांचा रात्रीचा धाडसी छापा! घरातून 2.78 किलो गांजा जप्त; राऊतवाडीत खळबळ

On: May 18, 2026 10:36 AM
Follow Us:
चिखलीतील राऊतवाडी परिसरात पोलिसांच्या छाप्यात जप्त करण्यात आलेला गांजा सदृश्य पदार्थ

चिखली प्रतिनिधी| विशाल गवई

चिखली शहरातील राऊतवाडी परिसरात पोलिसांनी रात्री मोठी धाडसी कारवाई करत एका घरातून तब्बल 2 किलो 780 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध अमली पदार्थ व्यापाराला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकून सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास चिखली पोलिसांना राऊतवाडी परिसरात अमली पदार्थ साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पवन चंपालाल रामावत (वय 35, रा. राऊतवाडी, चिखली) यांच्या राहत्या घरावर छापा टाकला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

घराची तपासणी सुरू असताना पोलिसांना गांजा सदृश्य पुड्या आढळून आल्या. त्यानंतर संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 2 किलो 780 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 1 लाख 40 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही संपूर्ण कारवाई राजपत्रित अधिकारी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच शासकीय पंच यांच्या उपस्थितीत पार पडली. पंचनामा करून जप्तीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.

दरम्यान, चिखली शहरात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले असून अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Related News


हे आवश्यक करा…

बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment