Advertisement
नांदुरा प्रतिनिधी/कट्टा न्यूज नेटवर्क
नांदुरा : जळगाव जामोद ते नांदुर्यात येणारी काळी पिवळी उलटून अपघात सोमवारी सायंकाळी निमगाव फाट्याजवळ घडला. या अपघातात गाडीतील १३ प्रवासी गंभीर जखमी झाले. काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले.
एम एच २८ एम ३०८६ या क्रमांकाची काळी पिवळी गाडी जळगाव जामोद येथून नांदुर्याकडे येत असताना चालकाचे स्टेअरिंग नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. अपघातात प्रवासी महेंद्र वानखडे (१७, अकोली), शाहीस्ता महमुद खान (२०, सुरत), फरीदा महमुद खान (४०, सुरत), अमान महमुद खान (१०, सुरत), अक्षरा संतोष तेलंग (७, पिं. राजा), अन्नपूर्णा संतोष तेलंग (३८, पिं. राजा), अंजना अशोक तायडे (६७, नांदुरा), संतोष रुस्तम तेलंग (४५, पिं. राजा), अशोक निनाजी तायडे (७२, नांदुरा), शबनम पठाण महमुद पठाण (२०, सुरत), महमुदखान बिस्मिल्लाह खान (५३, सुरत), भुसरा खान महमुद खान (१६, सुरत) आणि शाहीन जाकीर देशमुख (२४, सुरत) यांचा समावेश आहे.हे पण वाचा..
देवदर्शनासाठी निघाले, पण परतले नाहीत! अपघातात आतेभाऊ व मामेबहीण ठार.
जखमींना तातडीने नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले. गंभीर प्रकृती असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी खामगाव हलविण्यात आले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी त्वरित पोहचून तपास सुरु केला आहे.
तुरंत अधिक माहिती मिळवा