हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Honey Trap Case: बुलढाणा जिल्ह्यातील 23 वर्षीय महिला निघाली मुख्य सूत्रधार; सोशल मीडियातून जाळे, लाखोंची खंडणी

On: June 29, 2026 11:37 AM
Follow Us:
Honey Trap Case मध्ये जालना पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य सूत्रधार महिलेसह सहा आरोपींना अटक केली.

सिंदखेड राजा | समाधान सरकटे 

Honey Trap Case : जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बहुचर्चित हनीट्रॅप आणि खंडणी प्रकरणात पोलिस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेली 23 वर्षीय महिला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्याची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. चंदनझिरा पोलिसांनी तिला आणि तिच्या टोळीतील अन्य सहा आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला मूळची सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील माहेरची असून तिचे सासर पांगरी उगले येथे आहे. तिला एक मुलगी असून गेल्या सहा वर्षांपासून ती माहेर किंवा सासरी राहत नसल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

प्राथमिक तपासात आरोपींची टोळी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तींशी मैत्री करून त्यांना जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींचे अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामीची भीती दाखवत मोठ्या रकमेची खंडणी उकळल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

Honey Trap Case या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये अविनाश गणेश झोटे, अर्जुन चमन बहादूर राजपूत, शंकर माणिक जाधव, अतिश सतीश गायकवाड आणि सचिन लक्ष्मण कंठाळे यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना जालना पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

20 जून रोजी एका बोलेरो चालकाला जाळ्यात अडकवून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सुमारे दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 23 जून रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला.

आरोपी बुलढाणा जिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी देऊळगाव राजा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीतून इतर आरोपींनाही अटक करण्यात आली. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच सुमारे 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी छत्रपती संभाजीनगर परिसरातील एका आत्महत्येच्या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणातही तिला अटक करण्यात आली होती. कारागृहातून सुटल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या गुन्ह्यात तिचे नाव समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या सर्व आरोपांचा तपास सुरू असून अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.


वाचकांसाठी महत्त्वाचे

ऑनलाइन ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा संवेदनशील माहिती शेअर करण्यापूर्वी काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची धमकी किंवा खंडणीची मागणी झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर हेल्पलाइनवर तक्रार करा.


Related News


हे‌ आवश्यक करा

अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि स्थानिक बातम्यांसाठी KattaNews.in नियमित वाचा. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि आमचे WhatsApp व Facebook अपडेट्स नक्की फॉलो करा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

महाराष्ट्रात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री फडणवीस

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

विदर्भातील शेतकरी-शेतमजुरांसाठी राहुल गांधींना सुबोध सावजींचे आमंत्रण

विदर्भातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी यावे; सुबोध सावजींची ‘किसान एवं खेत मजदूरों की आवाज’ कार्यक्रमाची मागणी

केंद्रीय मंत्र्यांच्या गावाला जाणारी मोडकळीस एसटी बस, तारांनी बांधलेला पत्रा

केंद्रीय मंत्र्यांच्या मूळ गावाला जाणारी एसटीच मोडकळीस; तारांनी बांधलेली, पत्र्याच्या ठिगळाची बस… म्हणावी की धोक्याची सफर ?

Leave a comment