हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

घरात सुरू होता गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा; पीसीपीएनडीटी पथकाची धाड, बोगस डॉक्टर रंगेहात पकडला

On: June 28, 2026 3:15 PM
Follow Us:
मेहकरच्या परतापूर येथे गर्भलिंग निदान प्रकरणात पीसीपीएनडीटी पथकाची कारवाई करताना जप्त केलेले सोनोग्राफी मशीन

मेहकर |  समाधान सरकटे 

बुलढाणा जिल्ह्यातील  मेहकर तालुक्यातील परतापूर येथे घरातून सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या प्रकारावर पीसीपीएनडीटी पथकाने मोठी कारवाई केली. पोलिसांच्या मदतीने राबविण्यात आलेल्या या धाडीत एका बोगस डॉक्टरला गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरले जाणारे साहित्य, औषधे आणि इंजेक्शन जप्त करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परतापूर येथील एका घरात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच पीसीपीएनडीटी पथकाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून संबंधित घरावर पाळत ठेवली.

२७ जून रोजी दुपारच्या सुमारास अनिल रामदास सोनुने हा संशयित घरात दाखल झाला. त्याने गर्भवती महिलेची पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी सुरू करताच पथकाने घरात प्रवेश करून त्याला रंगेहात पकडले. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि गर्भपातासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईत संबंधित घरमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांविरुद्ध पीसीपीएनडीटी कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासादरम्यान संशयित डॉक्टर गर्भलिंग निदानानंतर गर्भपाताचीही तयारी करून येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मेहकर तालुका मागील काही वर्षांपासून अवैध गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्येच्या घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. यापूर्वीही अशा अनेक कारवाया करण्यात आल्या असून प्रशासनाने या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही गर्भलिंग निदान किंवा स्त्रीभ्रूणहत्येसारखे प्रकार आढळल्यास तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल.


📢 KattaNews.in वर मिळवा सर्वात आधी ब्रेकिंग अपडेट

महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, गुन्हे, सरकारी निर्णय, भरती, शेती, शिक्षण आणि स्थानिक घडामोडींचे अचूक व जलद अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in नियमित वाचा. ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.


Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

विदर्भातील शेतकरी-शेतमजुरांसाठी राहुल गांधींना सुबोध सावजींचे आमंत्रण

विदर्भातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी यावे; सुबोध सावजींची ‘किसान एवं खेत मजदूरों की आवाज’ कार्यक्रमाची मागणी

केंद्रीय मंत्र्यांच्या गावाला जाणारी मोडकळीस एसटी बस, तारांनी बांधलेला पत्रा

केंद्रीय मंत्र्यांच्या मूळ गावाला जाणारी एसटीच मोडकळीस; तारांनी बांधलेली, पत्र्याच्या ठिगळाची बस… म्हणावी की धोक्याची सफर ?

सिंदखेडराजा शेतकरी नुकसान भरपाई निवेदन देताना डॉ. शशिकांत खेडेकर आणि पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

वीज नाही म्हणून पीक जळालं तरी मदत मिळणार? सिंदखेडराजा शेतकरी नुकसान भरपाईचा मोठा निर्णय होणार का?

Leave a comment