हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सैलानी यात्रेसाठी हजारो भाविक चिखलीतून प्रवास; बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याच्या सुविधेची मागणी

On: March 13, 2026 10:56 AM
Follow Us:
चिखली बसस्थानकावर सैलानी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

कट्टा न्यूज | चिखली प्रतिनिधी| १३ मार्च २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक विविध भागांतून प्रवास करतात. यंदाही चिखली बसस्थानकातून हजारो भाविक सैलानी यात्रेला जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असताना चिखली बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी असल्यामुळे यात्रेकरूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चिखली तालुक्याच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सैलानी यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन बसस्थानक परिसरात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखली तालुका अध्यक्ष संतोष परिहार व तालुका उपाध्यक्ष राजेंद्र सुरडकर यांनी प्रशासनाने मानवीय दृष्टीकोनातून विचार करून यात्रेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. सध्या यात्रेच्या काळात बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर चिखली बसस्थानकावर येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.


Related News


हे आवश्यक करा..

आपल्या परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. आपल्या भागातील बातमी पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्ह्यात 24 तासांत 6 तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना

बुलढाणा हादरलं! अवघ्या 24 तासांत 6 तरुणी बेपत्ता; 12 वीची विद्यार्थिनीही गायब

सिंदखेडराजा तहसील कार्यालयात 17 मार्चला जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा लिलाव

जमीन महसूल थकबाकीवर मोठी कारवाई; सिंदखेडराजा तहसील कार्यालयात 17 मार्चला मालमत्तेचा जाहीर लिलाव

मलकापूर येथे ४० वर्षीय वीरेंद्र कासे यांची गळफास घेऊन आत्महत्या

मलकापूर हादरले! ४० वर्षीय वीरेंद्र कासे यांची घरात गळफास घेऊन आत्महत्या; ज्ञानेश्वर नगरमध्ये खळबळ

साखरखेर्डा येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

साखरखेर्ड्यात महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; “स्त्री शक्तीचा सन्मान हीच खरी ओळख” – वर्षाताई उगलमुगले

खामगाव येथील सर्पमित्र मंगेश कांबळे यांचा मण्यार सापाच्या दंशाने मृत्यू

“सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू!” खामगावमध्ये मण्यारच्या दंशाने 33 वर्षीय युवकाचा अंत

Short circuit causes wheat crop fire in Mera Budruk village Chikhli farmers controlling the fire

चिखली तालुक्यात धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग; शेतकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला 30 एकर पिकाचा पट्टा

Leave a Comment