हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा हादरलं! अवघ्या 24 तासांत 6 तरुणी बेपत्ता; 12 वीची विद्यार्थिनीही गायब

On: March 13, 2026 7:30 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यात 24 तासांत 6 तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना

बुलढाणा | १२ मार्च २०२६

बुलढाणा जिल्ह्यात अवघ्या 24 तासांच्या कालावधीत तब्बल सहा तरुण मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 मार्च 2026 रोजी घडलेल्या या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये 12 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींपासून ते फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणींचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलिस प्रशासन अत्यंत गांभीर्याने पाहत असून तपास सुरू करण्यात आला आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील रेणुका ज्ञानेश्वर मिरगे (17 वर्ष 5 महिने) ही विद्यार्थिनी 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता ‘12 वीचा पेपर द्यायला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र ती परीक्षा केंद्रावर पोहोचलीच नाही. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता ती सापडली नाही. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 (2) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रामपूर तालुक्यातील वैष्णवी नारायण तायडे (वय 21) ही तरुणी 9 मार्चच्या मध्यरात्री बेपत्ता झाली. तिच्या काकांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग नोंदवली आहे.

नांदुरा तहसील कार्यालयाजवळून प्रतिभा अनिल डाबेराव (वय 18 वर्ष 4 महिने) ही तरुणी 9 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता ‘ब्युटी पार्लरमध्ये जाते’ असे सांगून घरातून निघाली होती. त्यानंतर तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही.

खामगाव तालुक्यातील वर्णा येथील दिव्या संजय निबोळकर (वय 19) ही तरुणी 10 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता ‘मामाच्या गावाला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र तीही घरी परतली नाही.

बुलढाणा शहरातील मिलिंदनगर येथील समीक्षा कैलास मिसाळ (वय 18) ही विद्यार्थिनी 9 मार्च रोजी दुपारी 1 वाजता शिवाजी हायस्कूल येथे 12 वीचा पेपर देण्यासाठी गेली होती. मात्र ती संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही.

तसेच बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील शिवानी राजू कमळकर (वय 20) ही फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी 9 मार्च रोजी कॉलेजला गेली होती. रात्री 8 वाजता तिने वडिलांना फोन करून ‘मी लग्न करते’ असे सांगून फोन कट केला. त्यानंतर तिचा संपर्क तुटला.

जिल्ह्यात एकाच दिवशी आणि अवघ्या 24 तासांच्या कालावधीत विविध भागांतून सहा तरुणी बेपत्ता झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी पालकांना आवाहन केले आहे की आपल्या मुलांशी सतत संवाद ठेवा आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.


Related News


📢 अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा क्रीडांगणासाठी सरकारी जमीन राखीव ठेवण्याची मागणी करताना ग्रामस्थ

भावी पिढ्यांच्या खेळाच्या हक्कासाठी साखरखेर्डा ग्रामस्थांचा एल्गार; १.६२ हेक्टर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन आस्थापनांवर कारवाई करत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.

शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे – लोणार सरोवर, शेगाव, सिंदखेड राजा आणि आनंद सागर

बुलढाणा जिल्ह्यातील 25 प्रसिद्ध पर्यटन स्थळे; इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा संगम

सिंदखेडराजा येथील वैष्णव गडावर आषाढी एकादशीला हजारो वारकऱ्यांची पैदल वारी

आषाढी एकादशीला वैष्णव गडावर भक्तीचा महासागर! हजारो वारकऱ्यांची पैदल वारी, ३५ क्विंटल फराळ आणि ५०० सेवाधाऱ्यांची सेवा

बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पहिल्याच दिवशी अविरोध निवड

मोठी बातमी! बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे पहिल्याच दिवशी अविरोध विजयी

धामणगावात अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर धाड पोलिसांची कारवाई

धामणगावात अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर धाड पोलिसांचा धडाका; 5 जणांवर गुन्हे

Leave a Comment