हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक मागणी! अडोळी गाव विकत घ्या अन् शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; ठिय्या आंदोलन सुरू

Follow Us:
Adoli village farmer protest Washim loan waiver andolan shivaji maharaj statue shetkari

वाशिम |३ एप्रिल २०२६

अडोळी गावातील शेतकरी आंदोलन, कर्जमाफी आणि पीक विमा या प्रमुख मागण्यांसाठी आता उग्र रूप धारण करत आहे. अडोळी गावातील शेतकरी दि. २ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करत असून, “गाव विकत घ्या आणि आम्हाला कर्जमुक्त करा” अशी धक्कादायक मागणी त्यांनी सरकारसमोर ठेवली आहे.

शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये सरसकट कर्जमाफी, वाशीम जिल्ह्यासाठी पीक विमा लागू करणे, खाजगी फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवणे तसेच एमआयडीसी प्रकल्प उभारणे यांचा समावेश आहे. या सर्व मागण्यांसाठी शेतकरी ठाम असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या ठिय्या आंदोलनात युवा शेतकरी सतीश इढोळे, उपसरपंच भगवान इढोळे, परमेश्वर इढोळे, समाजसेवक राजकुमार पडघान, रामदास इढोळे, हनुमान इढोळे, नारायण इढोळे, प्रल्हाद खंडारे, माधव कोंडे, वामन पडघान, गणेश इढोळे, राजेंद्र खोलगाडे, राजू इढोळे, अर्जुना खंडारे, ज्ञानेश्वर इढोळे, गजानन इढोळे, अमोल खंडारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.दरम्यान, भारतीय कृषी पीक विमा योजनेचे प्रतिनिधी नवनाथ मगरे आणि नितीन घुगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी आक्रमक भूमिकेतच आहेत.

अडोळी गावातील हे आंदोलन आता संपूर्ण वाशीम जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरत असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

👉 अशाच ताज्या अपडेटसाठी Kattanews.in ला भेट द्या आणि आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास क्रीडांगणाच्या जमिनीवर जमलेले युवक

साखरखेर्ड्यात सरकारी ई-क्लास जमिनीवर डल्ला? क्रीडांगण नांगरून ताबा घेण्याचा प्रयत्न; युवक संतप्त

शिंदी गावात 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

शिंदीत 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने, गावावर शोककळा

Leave a Comment